Latest Marathi News | राशा येथे सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhumika & Ujjwala Raut

NashiK : राशा येथे सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू

पळसन (जि. नाशिक) : तलावात आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील राशा येथे रविवारी (ता. ३०) दुपारी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील राशा येथील भूमिका नरेंद्र राऊत (वय ११) व उज्ज्वला नरेंद्र राऊत (आठ) या दोघी सख्ख्या बहिणी राशाजवळील बर्डा शिवारातील तलावात आंघोळीसाठी गेल्या होत्या. (two sisters drowning death at Rasa Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik : पतीच्या नावाने पैसे काढणे भोवले; जऊळकेच्या महिला सरपंच ठरल्या अपात्र!

आंघोळ करत असताना त्या पाण्यात पडल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी बारा ते एकच्या दरम्यान घडली. दोघीही जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होत्या. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने राशा गावात शोककळा पसरली असून, या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक मधू पवार, नितीन ढेपले अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा: Nashik Crime : विद्युतपंप चोरट्यांचा धुमाकूळ!; ताहाराबाद परिसरातील शेतकऱ्यांत संताप

टॅग्स :NashikDeath by drowning