Nashik News : वणी- पिंपळगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीस चिरडले; तीघे जागीच ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death

Nashik News : वणी- पिंपळगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीस चिरडले; तीघे जागीच ठार

वणी (जि. नाशिक) : वणी - पिंपळगाव रस्त्यावरील बोराळे फाट्याजवळ अज्ञात वाहनाने मोटरसायकला दिलेल्या धडकेत काका व दोन पुतने असे तीन जण जागीच ठार झाले आहे. (Two wheeler crushed by unknown vehicle on Vani Pimpalgaon road Three killed on spot Nashik News)

मंगळवार, ता. १४ रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास वणी ते पिंपळगाव जाणारे रोडवर बोराळे फाटा येथे वणी बाजुकडून पिंपळगाव बसवंत कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहानाने तीसगांवहून वणी बाजुला येणाऱ्या मोटरसायकला जोरधार धडक दिली.

यात मोटरसायकलचा चेंडामेंढा होत मोटरसायकलवरील निवृत्ती सखाराम कराटे, वय ५५ वर्षे (काका), केदु यशवंत कराटे वय ३५ वर्षे (पुतण्या), संतोष विष्णू कराटे वय ३३ वर्षे (पुतण्या) सर्व रा. तीसगाव, ता. दिंडोरी हे जागीच ठार झाले.

शेत मजुरीचे काम करणाऱे हे तीघे काका- पुतने वणी येथे आठवडे बाजारासाठी येत असतांना त्यांच्यावर काळाने घाला घातला. अपघाताचे वृत्त कळताच पोलिसांनी मयतांना वणी ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

रात्री उशिरा ग्रामिण रुग्णालयात शव विच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पोलिस अपघात ककुन पलायन करणाऱ्या वाहानाचा शोध घेत आहे.

दरम्यान बोराळे फाटा ते तीस गांव फाटा हे दोन किलो मीटरचा रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहे. साखरेश्वर मंदीर ते बोराळे फाटया दरम्यान उताराचा रस्ता असल्याने व बोराळे फाटयावर काहीसा वळणाचा रस्ता असल्याने या भागात वाहानांचा वेग वाढण्याबरोबरच वळण असल्याने वाहानांवरील नियंत्रण सुटल्यामूळे अपघात होत असल्याचे प्राथमिकदृष्या निदर्शनास येत आहे.

सदरचा रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग व सिमेंट कॉ्क्रीटचा आहे. त्यामूळे या भागात अतिवेगामूळे वाहाने स्लिप होण्याचे प्रमाण अधिक असल्याने बोराळे फाटा येथे गतिरोधक बसविण्याची मागणी तीसगांव व बोराळे येथील ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान एकाच कुटुंबातील तीन कर्ते पुरुष अपघातात ठार झाल्याने कराटे कुटुंबासह तीसगांवावर शोककळा पसरली आहे.