Gopinath Munde Memorial : 2 एकरात उभे राहिले आकर्षक गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक : उदय सांगळे | Nashik News | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Memorial of People's Leader Gopinath Munde.

Gopinath Munde Memorial: 2 एकरात उभे राहिले आकर्षक गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक : उदय सांगळे

Sinnar News : नांदूरशिंगोटे येथे गावालगत असलेल्या अस्वच्छ तळ्याचे रूपांतर आकर्षक अशा लोकनेते (स्व) गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिस्थळात करण्यात आले असून परळीतील गोपीनाथ गडाच्या धर्तीवर नांदूरशिंगोटे येथील स्मारकास पंकजा मुंडे यांच्या परवानगीने ‘गोपीनाथ गड’ नाव देण्यात आले आहे.

परळी बाहेर गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक असल्याची माहिती उदय सांगळे यांनी दिली. (Uday Sangle statement attractive Gopinath Munde monument standing on 2 acres nashik news)

उदय सांगळे म्हणाले, स्मारकाचे भूमिपूजन ११ एप्रिल २०१८ ला करण्यात आले. या स्मारकाचे काम गेल्या चार वर्षापासून सुरू होते. प्रारंभी या तळ्याची असलेली दोन एकर जागा जेसीबीच्या साहाय्याने उकरून घेऊन स्वच्छ केली तेथील अतिक्रमणे काढून टाकले.

तळ्याचे क्राँक्रिटीकरण, अस्तरीकरण केले, आर्किटेक सुशांत पाटील यांनी स्मारकाचे डिझाईन केले. तळ्याच्या मध्यभागी सहा फुटाचा रॅम्प करून त्यावर १६ फुटी ब्राँझ पुतळा उभारण्यात आला आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

हा पुतळा जे जे स्कूल ऑफ आर्ट येथील प्रा. विजय बोंदर यांनी साकारला आहे. स्मारकात ४५० मीटरचा जॉगिंग ट्रॅक, गार्डन, ग्रीन जिम, मुलांसाठी खेळणी, प्रसाधनगृह आदी कामे केली आहेत. तसेच, परिसरात ८५ एलईडी लाइट बसविण्यात आले असून लँडस्केप गार्डन करण्यात आले आहेत.

या स्मारकासाठी सात कोटी रुपये खर्च झाले असून हा निधी जिल्हा परिषद ,पर्यटन विकास महामंडळ व ग्राम विकास विभाग यांच्याकडून उपलब्ध झाला आहे. नांदूरशिंगोटे येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक, पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. असे त्यांनी यावेळी नमूद केले.