Chhatrapati Shivaji Maharaj : सकल हिंदू समाजातर्फे मनपा प्रवेशद्वारात दुखवटा आंदोलन

movement by hindu
movement by hinduesakal
Updated on

धुळे : हिंदुत्ववादी सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांचे बॅनर (Banner) उतरविले जात असेल तर हे बॅनर पाकिस्तानात लावयचे का, असा सवाल करत सकल हिंदू समाजातर्फे महापलिकेच्या प्रवेशद्वारात दुखवटा आंदोलन करण्यात आले. (unauthorised banner remove of chhatrapati shivaji maharaj by municipal corporation Suffering movement by Hindu community dhule news)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर महापालिका व पोलिस प्रशासनातर्फे हटविण्यात आले. या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त करत शिवप्रेमी व सकल हिंदू समाजातर्फे शनिवारी (ता. ४) सकाळपासून महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडत दुखवटा आंदोलन सुरू केले.

आंदोलकांनी मनपा व पोलिस प्रशासनाच्या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारीला साजरी होणार आहे. या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात विविध संघटनांकडून शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारी बॅनर लावण्यात आली आहेत.

मात्र, महापालिकेच्या जुन्या, नव्या इमारतीजवळील बॅनर महापालिकेतर्फे हटविण्यात आले. या कारवाईबाबत काही शिवप्रेमी, सकल हिंदू समाजातर्फे नाराजी व्यक्त करत महापालिकेच्या कारवाईच्या निषेधार्थ मनपा प्रवेशद्वारात दुखवटा आंदोलन केले. मनपा प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या विरोधात प्रतीकात्मक तिरडी आणून हे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

movement by hindu
Dhule Crime News : धारदार शस्त्राने भोसकून शिरपूरला तरुणाचा खून

त्यानंतर आंदोलकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेला. मात्र हा मोर्चा रस्त्यातच अडविण्यात आला. बॅनर न काढण्याचे तोंडी आश्‍वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, दिलेले आश्‍वासन पाळले गेले नाही तर धुळे बंदची हाक देण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.

आंदोलनात रणजित भोसले, विक्की परदेशी, सुमीत पवार, अतुल सोनवणे, युवराज कालेवार, आकाश परदेशी, मोहन टकले, बंटी सोनवणे, पप्पू डापसे, जयेश मगर, किरण अहिरे, निखिल मोमया, ललित देवरे, तुषार नवले, भूषण सूर्यवंशी, गौरव गिते, पंकज धात्रक यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

movement by hindu
Nashik Crime News: सिन्नर परिसरात धर्मांतराचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; कथित फादरसह चौघांना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com