महापालिकेच्या आडून अनधिकृत धंदे; NMCचे दुर्लक्ष | Latestv Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Board of Parks Department of Municipal Corporation

महापालिकेच्या आडून अनधिकृत धंदे; NMCचे दुर्लक्ष

नाशिक : विनयनगर येथे १३ एकर भूखंडावर बिनशेती परवानगी न घेता तसेच ले- आउट मंजूर नसताना बांधकाम सुरू आहे. विशेष म्हणजे तयार झालेल्या घरांना महापालिकेने नळजोडणी देण्याबरोबरच या भागात पायाभूत सुविधा पुरविल्या जात असूनही महापालिकेच्या नगररचना व अतिक्रमण विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

असे असताना आता बेकायदा बांधकामाचा नवा प्रकार समोर आला आहे. या भागात महापालिकेच्या उद्यान विभागाचा बोर्ड लावून महापालिकेचे काम चालू असल्याचे दर्शवून बेकायदा बांधकामे होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी लक्षात आणून दिले आहे. (Unauthorized businesses under of NMC nashik Latest Marathi News)

नाशिक शिवारातील विनयनगर येथे सर्व्हे क्रमांक ८६६/१/१ मध्ये गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत मोठ्या वसाहतीचे बांधकाम चालू आहे. सदर भूखंड कच्ची जमीन अर्थात शेतीचे बिनशेतीमध्ये रूपांतर न करता तसेच ले-आउट मंजूर नसताना प्लॉट पाडून बेकायदेशीररीत्या विक्री करून जमिनीच्या व्यवहाराबद्दल माहिती नसलेल्या नागरिकांची फसवणूक केली जात आहे.

इनामी प्रकारच्या या जागेवर पक्के बांधकाम चालू आहे. या संदर्भात महापालिकेने भूखंडावर चालू असलेल्या बांधकामांना नोटीस बजावली, मात्र हा फक्त कागदोपत्री सोपस्कार ठरला. अनधिकृत बांधकाम संदर्भात तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रार केली होती.

श्री. पवार यांनी तातडीने कारवाईच्या सूचना अतिक्रमण विभागाला दिल्या. अतिक्रमण विभागाने पूर्व विभागाशी संपर्क साधला, मात्र तोही सोपस्कार ठरला. स्थानिक पातळीवर दाद मिळत नसल्याने तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विनयनगर रहिवासी संघातर्फे निवेदन देण्यात आले.

परवानगी न घेता या भागात शेत जमिनीवर बांधकाम सुरू असल्याने स्थानिक नागरिकांनी तक्रार करून दखल घेतली नाही. मात्र, दुसरीकडे येथील घरांना पाणीपुरवठा, रस्ते पद्धती आदी सुविधा पुरविल्या जात आहे. सुविधा पुरवून महापालिकेकडूनच अनधिकृत बांधकामे सुरक्षित करण्याचे उद्योग सुरू असताना आता थेट महापालिकेच्या बॅनरखाली अनधिकृत घरांच्या बांधकामांना संरक्षण दिले जात आहे.

हेही वाचा: दुचाकीस्वारांनो नाशिकमध्ये पावसात वाहन चालवताना सर्व्हिस रोड वापरा अन्यथा...

बोर्ड उद्यान विभागाचा; कामे खासगी

सर्वे क्रमांक ८६६/१ मध्ये सादिकनगरमध्ये उद्यान विभागाचा बोर्ड लावण्यात आला आहे. परंतु महापालिकेचा व जागेचा काही संबंध नाही. बाहेरून आलेल्या नवीन व्यक्तीला सदरची जागा महापालिकेची असून महापालिकेकडून जागा विकसित केले जात असल्याचे दर्शविले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

यासंदर्भात विनयनगर ज्येष्ठ नागरिक संघ, राधा वल्लभ बहुउद्देशीय संस्था, श्री सप्तश्रृंगी देवी सामाजिक सांस्कृतिक मंडळ, श्री पंचमुखी हनुमान देवस्थान, श्री सिद्धी विनायक मित्र मंडळ, शिपंचायतन हनुमान मंदिर आदी संस्थांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

हेही वाचा: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहर पोलिसांची नाशिककरांसह दौड

Web Title: Unauthorized Businesses Under Of Nmc Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashiknmcUnauthorized