नाशिक- महापालिकेकडून शहरात अनधिकृत शाळांचा शोध सुरू आहे. त्यात जेल रोड येथील एक व अंबड भागातील चुंचाळे येथील हिंदी शाळेचा समावेश आहे. या दोन शाळा अनधिकृतरीत्या चालविल्या जात असल्याने दोन्ही शाळांना शिक्षण विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी दिली.