MGNREGA Scheme : मनरेगातंर्गत वित्तीय मर्यादानुसार अधिकाऱ्यांना मान्यतेचे अधिकार!

अभिसरणाच्या कामांना लागू नसेल ‘सेक्युलर' प्रणाली
MGNREGA News
MGNREGA Newsesakal

MGNREGA Scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनांच्या कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेच्या धोरणात राज्य सरकारने सुटसुटपणा आणला आहे. वित्तीय मर्यादानुसार अधिकाऱ्यांना मान्यतेचे अधिकार देण्यात आले आहेत.

तसेच मनरेगातंर्गतच्या कामाशिवाय अभिसरणातील कामांना ‘सेक्युलर' प्रणाली लागू नसेल, असे स्पष्ट करण्यात आले. (Under MGNREGA authority to approve authorities according to financial limits nashik news)

मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी ‘नरेगा सॉफ्ट' आणि ‘सेक्युलर' अशा दोन संगणक प्रणाली सुरु करण्यात आल्या आहेत. ‘सेक्युलर' प्रणाली पंचायत यंत्रणेसाठी लागू करण्यात आली आहे.

वित्तीय मर्यादानुसार कामे करणारी सरकारी यंत्रणा, प्रशासकीय मान्यता देणारे अधिकारी पुढीलप्रमाणे असून (कंसात तांत्रिक मान्यता देणारे अधिकारी दर्शवितात) : २५ लाखांपर्यंत-ग्रामपंचायत-गटविकास अधिकारी तथा सहकार्यक्रम अधिकारी (वैयक्तिक कामे ७ लाखांपेक्षा अधिक व सार्वजनिक कामांसाठी-पंचायत समिती,

पंचायत कृषी, तालुका तथा उपविभागीय तांत्रिक अधिकारी, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम, राज्य बांधकाम उपविभाग, मृद व जलसंधारण, जलसंपदा. वैयक्तिक कामे ७ लाखांच्या मर्यादेत-कनिष्ठ, शाखा अभियंता पंचायत समिती,

सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, जलसंपदा). इतर यंत्रणा-जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, राज्य बांधकाम, मृद व जलसंधारण, जलसंपदा-जिल्हा परिषद बांधकामचे कार्यकारी अभियंता, राज्य बांधकाम, मृद व जलसंधारण,

जिल्हास्तरीय कृषी, वने, सामाजिक वनीकरण (इतर यंत्रणेचे तालुकास्तरीय तांत्रिक अधिकारी-जिल्हा परिषद बांधकामचे उपअभियंता, मृद व जलसंधारण, जलसंपदा, तालुका कृषी अधिकारी, वन परिक्षेत्र अधिकारी, वने व सामाजिक वनीकरण).

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

MGNREGA News
Nashik Leopard Attack : नरभक्षक बिबट्याला जेरबंद करा अन्यथा.... वन विभागाचे जवान तैनात!

२५ लाखांपेक्षा अधिक किमतीसाठी-ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम, मृद व जलसंधारण उपविभाग- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह जिल्हा कार्यक्रम समन्वयक (जिल्हा परिषदेचा व तत्सम यंत्रणेचा विभाग पातळीवरील तांत्रिक अधिकारी-कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम, मृद व जलसंधारण).

इतर यंत्रणा राज्य बांधकाम, मृद व जलसंधारण, जलसंपदा-जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक (तत्सम यंत्रणेचा विभाग पातळीवरील तांत्रिक अधिकारी-कार्यकारी अभियंता राज्य बांधकाम, मृद व जलसंधारण, जलसंपदा).

MGNREGA News
Dada Bhuse on Ajit Pawar : अजितदादा अस्वस्थ, काहीही होऊ शकतं : भुसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com