उन्हाच्या तीव्रतेपासून कैऱ्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

उन्हाच्या तीव्रतेपासून कैऱ्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग

अंबासन (जि.नाशिक) : उन्हाचा तीव्र फटका नागरिक आणि जनावरांनाच नाही तर फळबागांनाही बसू लागल्याचे चित्र दिसत आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी उन्हाच्या लाटेपासून फळबागा वाचविण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवित शर्तीचे प्रयत्न करीत आहेत तर बहुतांश आंबा उत्पादक शेतकरी कच्ची लगडलेली कैरी व फुलोरा वाचविण्यासाठी दिवसातून चार ते पाच वेळा थंड पाण्याच्या फवारणीचा मारा करत असून यात तप्त उन्हापासून काहीसा बचाव होत असल्याचे आंबा उत्पादकांकडून बोलले जात आहे.

फळ बागायतदारांपुुढे मोठे आव्हान

उन्हाचे चटके दिवसागणिक वाढतच चालल्याने शेतीव्यवसाय अडचणीत सापडत चालला आहे. शेतातील कांदा पिकांवर करपा रोगाने आधिच आक्रमण केलेले असतानाच आता उन्हाळा सोसावा तरी कसा? या द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे. सद्या उन्हाचा प्रकोप वाढल्याने शेतीव्यवसाय तसेच फळ बागायतदारांपुुढे वाचविण्यासाठी मोठे आव्हान उभे ठाकले आहे. कसमादे परिसरात सध्या आंब्याच्या झाडावर मोठ्या प्रमाणात मोहर लगडलेला असून कधी अवकाळी पाऊस, वारा तर कधी ढगाळ वातावरण या परिस्थितीवर मात करूनही बहुतांश आंब्याच्या झाडावर मोहर, कैऱ्या लगडलेल्या दिसून येत आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या लाटेमुळे गोड कैरी आंबट झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तीव्र उष्णतेमुळे फक्त नागरिक व जनावरांवर नाही तर शेतीपिकांसह फळ बागेवरही परिणाम दिसून येत आहे.

हेही वाचा: नाशिक : गोठे, तबेल्यांचे परवाना नूतनीकरण बंधनकारक

उन्हाच्या तीव्र लाटेचा फटका बसू नये यासाठी बहुतांश डाळींब उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील जुन्या साड्या विकत घेऊन तसेच कागदी पेपराने फळांना आवरण दिले आहे. दुग्धव्यावसायिक शेतकरी जनावरांची निगा राखण्यासाठी गोठ्यात पाण्याचा मारा करीत आहेत. सर्वाधिक उन्हाची झळ खरबूज, पपईला बसणार असल्याने उत्पादक संकटात सापडणार आहेत. दरम्यान आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी क्लृप्ती लढवत लगडलेल्या आंब्याच्या मोहरांवर व कच्च्या कैरींवर दिवसातून तीन ते चार वेळा थंड पाण्याची फवारणी करीत असून यामुळे काहीसा बचाव होत असल्याचे उत्पादकांकडून बोलले जात आहे. तीव्र उन्हामुळे परिसरात अनेक आंबा उत्पादकांच्या आंब्यांच्या झाडावरील मोहोरांवर परिणाम दिसून येत असून मोहोर कुजणे, लगडलेली कैरीही गळून पडत असल्याचे चित्र आहे अशा वेळेस पाण्याची फवारणी करणे आवश्यक असल्याचे मत आंबा उत्पादक शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

''आमच्या शेतात पंचवीस आंब्यांच्या झाडांची लागवड केली आहेत. यात विविध जातीचे झाडे आहेत मात्र तप्त उन्हामुळे मोहर व कैरी गळून लागताच. आम्ही दिवसातून तीन ते चार वेळा पाण्याची फवारणी सुरू केली यात बराचसा फरक जाणवत आहे.'' - शरद गमण देवरे, आंबा उत्पादक करंजाड.

हेही वाचा: 'खड्ड्यांचे गाव' म्हणून राज्यात 'या' गावाची नवी ओळख

''तीव्र उष्णतेमुळे आंब्यांचा मोहर व लगडलेली कच्ची कैरी गळून पडत होती. उन्हाचे चटके जसजसे वाढू लागले कैरी गळण्याचे प्रमाणातही वाढ होत होती. पाण्याची फवारणी करू लागताच काहीशी गळ थांबण्यास मदत होत आहे.'' - दिनेश वाघ, शेतकरी वरचे टेंभे.

Web Title: Unique Experiment Of Farmers To Save Mangoes From The Heat Of Summer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top