Hindu- Muslim Unity : भद्रकाली पोलीस ठाण्यात घडले हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन

Muslim staff manning the police station
Muslim staff manning the police stationesakal

जुने नाशिक : सर्वत्र ‘हम सब एक है’, असे म्हटले जाते. भद्रकाली पोलिस ठाण्यात प्रत्यक्षात अनुभवास मिळाले. हिंदू- मुस्लिम भाईचाऱ्‍याचे दर्शन या ठिकाणी घडले. दिवाळी सण साजरा करण्यासाठी मुस्लिम पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सहा तासाची सुटी देत पोलिस ठाण्याची धुरा सांभाळली. (Unity vision of Hindu Muslim unity happened in Bhadrakali Police Station Latest Marathi News )

सोमवारी (ता. २४) दिवाळी सणास उत्साहात सुरवात झाली. प्रत्येक जण आपल्या कुटुंबीयांसमवेत लक्ष्मीपूजन करत फटाके उडवण्याचा आनंद घेत होता. पोलिस, अग्निशामक कर्मचारी तसेच देशाचे सैनिक इतरांना आनंदात सण साजरा करता यावा, यासाठी स्वतः कर्तव्यावर हजर होते. भद्रकाली पोलिस ठाण्यात मात्र वेगळे चित्र बघण्यास मिळाले.

वर्षातील सर्वात मोठा दिवाळी सण आपल्या हिंदू सहकारी बांधवांना त्यांच्या कुटुंबीयांबरोबर साजरा करता यावा, लक्ष्मीपूजन करण्याचे सौभाग्य लाभावे. या भावनेतून पोलिस ठाण्यात नियुक्त असलेले वसीम शेख, कय्यूम सय्यद, बंटी सय्यद, साहिल सय्यद अशा चार कर्मचाऱ्यांनी इतर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सहा तासासाठी सुटी दिली.

Muslim staff manning the police station
Nashik : घंटागाडी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा; 2 तोळे सोन्याची पोत केली परत

त्यानंतर सर्वत्र जबाबदारी स्वीकारत पोलिस ठाणे सांभाळले. त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे इतर सर्वांना कुटुंबीयांसोबत आनंदात दिवाळी साजरी करण्याचा अनुभव घेता आला. याशिवाय पारंपारिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यास मिळाले. चौघांच्याही कर्तव्य दक्षतेची आणि सहकाऱ्यांप्रती असलेली आपुलकीची भावना धार्मिक सामाजिक एकोपाची प्रतीक ठरली. सर्वत्र याची चर्चा सुरू होती. यांचा आदर्श इतरांनी घेत समाजातील दोन धर्मांमधील तेढ नाहीसा करून समाजकंटकांना चांगला धडा शिकवावा, असेही चर्चा दरम्यान सांगण्यात आले.

दुसरीकडे आपल्या थोड्याशा वेळाने आपल्या सहकारी बांधवांना दिवाळी साजरी करण्याचा आनंद मिळाला याचे समाधान वाटत असल्याच्या प्रतिक्रिया चौघांकडून देण्यात आल्या. पोलिस विभागास कुठलीही जात-पात नसते. याचे उत्तम उदाहरण या घटनेतून घालून देण्यात आले.

Muslim staff manning the police station
Solar Eclipse 2022 : खगोलप्रेमींनी अनुभवला ग्रहणाचा थरार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com