Unseasonal Rain : आज सकाळपासूनच वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्मी दिसून येत होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानकपणे पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला पाच मिनिटे पावसाच्या सरींसोबत गारा उसळल्या, मात्र पाच मिनिटानंतर गारा बंद झाल्या व सुसाट्याच्या वाऱ्या सोबत पावसाला सुरुवात झाली. (Unseasonal Rain Heavy rain with hail at Nandur Shingote nashik news)
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
मात्र एकाएकी सुरू झालेल्या पावसामुळे शेतावर कांद्याच्या पोळी झाकण्यासाठी शेतकरी वर्गाची धांदल उडाली.
काही शेतकरी वर्गाने धावपळ करीत कागदाने कांदे पोळी झाकल्या, मात्र काही शेतकऱ्यांच्या कांदा पोळी पावसाने भिजल्या कारण एकाएकी आलेल्या पावसामुळे शेतकरी त्या पोळी झाकू शकले नाही, त्यामुळे सुमारे वीस मिनिटे या परिसरामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची थोडीफार प्रमाणात नुकसान झाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.