Unseasonal Rain : कसमादेत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; नांदगाव, देवळा, चांदवडला तालुक्यात गारपीट

A layer of hailstones steaming from many fields on the ghats. Wind damage to onion shed.
A layer of hailstones steaming from many fields on the ghats. Wind damage to onion shed.esakal

नाशिक : जिल्ह्यातील नांदगाव, चांदवड, कळवण, देवळा आदी तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कसमादेत सलग दुसऱ्या दिवशी गारपीट, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. 

या पावसात शेतपिकांसह राहत्या घरांचे देखील मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडली. पावसानंतर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करत भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. (Unseasonal rain with stormy winds in Kasmade Hailstorm in Nandgaon Deola Chandwad taluka nashik news)

घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह गारपीट

नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर जातेगांव, बोलठाण, लक्ष्मीनगर, आझादनगर जेऊर (ता.कन्नड) आणि परिसरात रविवारी (ता.९) सायंकाळी वीजेच्या कडकडाटासह बेमोसमी पाऊस, गारपीट आणि वादळ झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

 वादळामुळे जातेगाव येथील श्रीराम मंदिर जवळील शेवरीचे झाड उन्मळून विजेच्या तारेवर पडल्याने खांब पडला. येथील रहिवासी व सध्या सैन्यदलातील जवान शशिकांत आणि गणेश यांच्या राहत्या घराचे १२ पत्रे उडून गेले. 

तर शेतातील साठवून ठेवलेला दहा क्विंटल कापूस आणि धान्याचे नुकसान झाले आहे. सहारा कृषी सेवा केंद्राचे संचालक गुलाब चव्हाण यांनी दादासाहेब भावराव सोनवणे यांच्या शेतातील मध्ये साठवून ठेवलेला ३०० क्विंटल कांदाचे नुकसान झाले. 

कोकिळाबाई पाटील या महिला शेतकरी यांचे शेडनेट वादळामुळे उडाल्याने दहा लाख रुपयांचे आणि त्यातील दोन लाख रुपये किमतीच्या शिमला मिरची पिकाचे नुकसान झाले. आजच्या पावसाने उन्हाळ कांदा, मका इत्यादी पिकांचे तसेच काढणीस आलेला कांद्यचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

जळगावला घरांचे पत्र उडाले

नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रूक येथे अवकाळी पावसाने दोन शेतकऱ्यांच्या घरांचे पत्रे उडून गेले. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र झोळीत असलेली बालिका थोडक्यात बचावली. 

घराचे पत्रे उडाल्यानंतर घरातील संसारपयोगी वस्तूंचे पावसात भिजून मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसानंतर एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक नितीन लालसरे यांनी प्रशासनाला नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

A layer of hailstones steaming from many fields on the ghats. Wind damage to onion shed.
Nashik News : राजापूरच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी; लष्करी जवानाकडून शाळेला वॉटर फिल्टर

देवळा तालुक्यात अवकाळीची हजेरी

शहरासह तालुक्यातील काही गावात रविवारी (ता.९) अवकाळी पाऊस झाला तर चिंचवे, कुंभार्डे परिसरात गारा पडल्या. यामुळे काढणीला आलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. देवळा येथे आठवडे बाजार असल्याने अचानक पावसाने हजेरी लावल्याने साऱ्यांचीच तारांबळ उडाली.

तसेच कांदा काढत असलेल्या शेतकऱ्यांना कांदा झाकण्यासाठी धावपळ करावी लागली. दिवसभर ढगाळ आणि दमट वातावरण असल्याने कमालीचा उकाडा जाणवत राहिला. या पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करत नुकसान भरपाई द्यावी अशी पाहणी होत आहे.

चांदवडला पावसाने झोडपले

चांदवड तालुक्यातील रेडगाव, कोलगेट पाटे, साळसाने, वाहेगाव साळ, काजीसांगवी, सोनीसांगवी आदी ठिकाणी पावसाने हजेरी लावली. या पावसाने उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. काढणीला आलेल्या कांदा आता सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुलतानी आणि अस्मानी संकटामुळे शेतकरी पुरता बेजार झाला आहे.

A layer of hailstones steaming from many fields on the ghats. Wind damage to onion shed.
Water Crisis : हंडाभर पाण्यासाठी ठोकळवाडीचा टाहो! अमृत महोत्सवी वर्षातही महिलांच्या नशिबी संघर्षच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com