अवकाळी पाऊस, उन्हामुळे कांदा पिकावर करपा रोग | Agriculture | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदा

अवकाळी पाऊस, उन्हामुळे कांदा पिकावर करपा रोग

खामखेडा (जि. नाशिक) : अवकाळी पावसानंतर तीन दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेने चाळीशी गाठली आहे. या लाटेचा प्रभाव कसमादे भागासह जिल्हाभरात जाणवत आहे. उन्हाच्या कडाक्याने आरोग्याच्या तक्रारी वाढणार आहेत. या वातावरणाचा परिणाम कसमादे भागातील कांदा (onion) पिकावर झाला असून, करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने उत्पादक धास्तावला आहे. कांदा उत्पादनावर अवकाळी (Premature) पाऊस व उन्हामुळे परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रामध्ये 229 हेक्टरवर अतिक्रमण; वनक्षेत्र अहवालात नोंद

हवामान खात्याने राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार कसमादे भागात शनिवार (ता. १२) पासून पारा ३६ अंशाच्या पुढे गेला आहे. किमान तापमान १६.५ अंशापर्यंत आहे. चार दिवसांपासून दिवसा कडकडीत उन्हासह उष्म्याच्या झळा बसू लागल्या आहेत. अवकाळी पावसाने कसमादे भागातील कांदा उत्पादनावर परिणाम होणार आहे. खामखेडा परिसरात सलग दोन दिवस झालेल्या अवकाळीनंतर लगेचच उन्हाची तीव्रता वाढल्याने डिसेंबर महिन्यातील लागवड केलेल्या कांद्यावर करपा दिसू लागला आहे.

हेही वाचा: 'तर अशा शाळांची मान्यता रद्द होणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

गेल्यावर्षी मार्च महिन्यात कसमादे भागात कमाल पारा ३२ अंश आणि किमान १५ अंशांपर्यंत होता. मात्र, यावर्षी मार्चच्या मध्यातच तापमानाने चाळीशी गाठल्याने यंदाचा उन्हाळा चांगलाच कडक जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मागील आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर उष्मा वाढला आहे. सकाळी ११ वाजल्यानंतर अनेक ठिकाणी शुकशुकाट दिसत आहे.

आंबा मोहराचे नुकसान

सध्या आंब्याला (Mango) हवामानामुळे उशिरा मोहर आला. मात्र, उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने मोहर गळू लागला आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यात आलेल्या मोहोराला काही प्रमाणात फळे लागली आहेत. उन्हामुळे कैऱ्या (Raw Mango) पिवळ्या पडू लागल्या आहेत.

अवकाळी पावसानंतर उन्हाच्या चटक्यामुळे कांदा पिकावर करपा जाणवू लागला आहे. करपा येऊ नये म्हणून औषध फवारणीदेखील उन्हामुळे करता येणार नसल्याची परिस्थिती आहे. अधिकच्या उन्हाने कांदा उत्पादनावर परिणाम होईल, असे चित्र आहे.

- दत्तात्रय शेवाळे, कांदा उत्पादक, खामखेडा

Web Title: Unseasonal Rains And Heat Caused Onion Crop Disease

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..