esakal | आगामी महापालिका निवडणुक : एक सदस्यीय रचनेचा नगरसेवकांनी घेतला धसका..!
sakal

बोलून बातमी शोधा

corporators

एक सदस्यीय रचनेचा नगरसेवकांनी घेतला धसका !

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : आगामी महापालिका निवडणुकीसाठी (Upcoming municipal elections) एक सदस्यीय प्रभाग होतो की दोन, याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र एक सदस्यीय रचना अडचणींची ठरणार असल्याने मत अनेक विद्यमान नगरसेवकांनी (corporators) व्यक्त केली. अर्थात काम करणाऱ्यांना कशीही रचना झाल्यास अडचणी येणार नसल्याचे ज्येष्ठ नगरसेवकांनी सांगितले.

दोन सदस्यीय रचनेला अनुकूलता

नाशिकसह काही महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीत होत आहेत. या पार्श्वभूमीवर एक सदस्यीय प्रभाग रचनेचा आग्रह आघाडी सरकारने धरला आहे, तर भाजपने किमान दोन सदस्यांचा प्रभागांबाबत अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे प्रभाग रचना कशी होते, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. याबाबत पंचवटी विभागातील काही नगरसेवकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता काहींनी जनतेची कामे प्रामाणिकपणे करणाऱ्यांना कशीही रचना झाल्यास निवडून येण्यास अडचण नसल्याचे मत व्यक्त केले. प्रथमच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी एक सदस्यीय प्रभाग रचना झाल्यास प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांवर अन्याय होऊ शकतो, अशी भावना व्यक्त करत महिला व पुरुष असा दोन सदस्यीय रचनेला अनुकूलता व्यक्त केली.

हेही वाचा: नाशिक : आसारामबापू आश्रमाच्या संचालकाला अटक

महाआघाडी ‘एक’साठी आग्रही

महापालिकेत सत्तारूढ भाजपचे तब्बल ६६ जण २०१७ च्या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यात पंचवटी विभागातून चोवीसपैकी १९ जण निवडून आले होते. अर्थात चार सदस्यीय प्रभाग रचना असल्याने अनेक ज्येष्ठ विद्यमान नगरसेवकांनी स्वतःबरोबरच अन्य तिघांच्या विजयासाठी प्रयत्न केल्याने भाजपने सहज बहुमत मिळविले होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन भाजपची सत्ता जाऊन शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडी सरकार सत्तेत आले. महाआघाडी ‘एकसदस्य’ रचनेसाठी आग्रही असल्याचे दिसते.

हेही वाचा: नाशिकच्या कांद्याची स्पर्धा! सिंगापूर-मलेशियामध्ये बोलबाला

अनेकांचे तळ्यात मळ्यात

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा करत नाशिककरांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला होता. या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिककरांनीही भाजपच्या पारड्यात भरभरून ‘दान’ टाकले होते. त्यामुळे महापालिका इतिहासात प्रथमच एका पक्षाला स्पष्ट बहुमतापर्यंत पोचणे शक्य झाले होते. त्यावेळी भाजपात ‘सबकुछ बाळासाहेब सानप’ अशी स्थिती असल्याने त्यांनीही जिवाचे रान केल्याने भाजपने चोवीसपैकी एकोणीस जागा जिंकल्या होत्या. आता परिस्थिती बदलली असल्याने अनेकांचे तळ्यात मळ्यात सुरू झाल्याचे दिसून आले. काही ज्येष्ठ नगरसेवक मात्र प्रभाग कसाही झाला तरी काम करणाऱ्यांना अडचणी नसल्याची प्रतिक्रिया नोंदविलेली आहे. मात्र, बहुसंख्य नगरसेवक एक सदस्यीय प्रभाग रचनेला अनुकूल नसल्याचे दिसून आले.

loading image
go to top