'अरे बाबा, माघार घे..!' म्हणत गावपुढारी, पॅनलप्रमुखांकडून बंडखोरांची मनधरणी

 4Gram_panchayat_election.jpg
4Gram_panchayat_election.jpg

नैताळे (नाशिक) : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून निफाड तालुक्याची जशी ओळख आहे त्याचप्रमाणे येथील राजकारणही जिल्हावासीयांच्या दृष्टीने उत्सुकतापूर्वक असते. तालुक्यात सध्या ६५ ग्रामपंचायतींची निवडणूकप्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सोमवारचा शेवटचा दिवस माघारीचा आहे. ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी व बंडखोरांना शांत करण्यासाठी आता ‘अरे बाबा, माघार घे...’, अशी मनधरणी गावपुढाऱ्यांकडून होताना दिसत आहे. मंगळवारी निवडणूक लढविणारे सर्व उमेदवार आपापल्या पॅनलचा प्रारंभ करून प्रचाराचा धुराळा उडवून देणार आहे. 

सोमवारचा दिवस माघारीचा शेवटचा

निफाड तालुक्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका अनेक महिने लांबल्या होत्या. अनेक महिन्यांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले उमेदवार जोमाने कामाला लागले आहेत. तालुक्यात ६५ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहे. या निवडणुकीसाठी २,४४९ उमेदवारांनी आपापले नामनिर्देशनपत्र भरून निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला आहे. यापैकी छाननीत ४२ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र बाद झाले. तर २,४०७ नामनिर्देशपत्र राहिलेले आहे. आता ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी व पॅनलनिर्मिती होऊन शिल्लक राहिलेल्या उमेदवारांकडून मतांची विभागणी होऊ नये म्हणून अशा बंडखोर उमेदवारांना बसविण्यासाठी गावपुढारी शर्थीचे प्रयत्न करत आहे. काही ठिकाणी तर आश्‍वासनांचा जणू पाऊसच पडत आहे. अनेकांना तंटामुक्तीचे अध्यक्षपद, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्षपद, सोसायटी निवडणुकीत उमेदवारी देऊ, चेअरमन करू, असे आश्‍वासन दिले जात आहे. सोमवारचा दिवस माघारीचा शेवटचा असल्याने गावपुढाऱ्यांची धावपळ होत आहे. अनेक गावात पॅनलप्रमुखांच्या बंगल्यावर, शेतावर बैठका होत आहेत. 

तू तिकडून, तर मी ईकडून! 

अनेक गावांत गावपुढारी निवडणूक बिनविरोध करण्याचा फंडा राबविण्याचा प्रयत्न करत असताना तरुण उमेदवार मात्र बिनविरोध निवडणुकीचा डाव उधळून लावत आहे. ‘अभी नही तो, कभी नही’, असे म्हाणत ‘तू तिकडून, तर मी इकडून’ असे म्हणत अनेक उमेदवार राजकीय आखाड्यात दंड थोपटत आहे. राज्यात शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस- राष्ट्रीय काँग्रेस यांची महाविकास आघाडी असली तरी गावागावांत या पक्षांचे कार्येकर्ते मात्र एकमेकांसमोर उमेदवारी करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com