Vadhavan Port : वाढवण ते समृद्धी महामार्ग जोडमार्ग लवकरच; १४ हजार कोटींचा प्रकल्प! दळणवळणाला मिळणार गती
Overview of Vadhavan to Balasaheb Thackeray Prosperity Highway : मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत वाढवण बंदर ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी फ्रेट कॉरिडॉरची माहिती दिली. या सुमारे १०४ किमी लांबीच्या सहा लेनच्या मार्गामुळे प्रवासाचा वेळ ४-५ तासांवरून १-१.५ तासांवर येणार आहे.
नाशिक: वाढवण बंदर ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जोडमार्गाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. या प्रकल्पासाठी १४ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली.