
नाशिक : लंडन येथील अडक्स संघटनेने सुरू असलेल्या स्पर्धेत नाशिकचा युवक भारतीय पथकाचे नेतृत्व करीत असल्याने स्पर्धेकडे सगळ्याचे लक्ष लागून आहे. (vaibhav shinde of Nashik will raise flag in competition of ironman in America Latest Marathi news)
लंडन- एडिंबरो- लंडन-(LEL)-2022 स्पर्धेत नाशिकचा आयर्मन विभव विश्वनाथ शिंदे (२९) हा तरुण करत आहे. विभव बंगळुरूच्या सिस्को कंपनीतील सिनिअर इंटरनेट कन्सल्टंट इंजिनिअर असून तो आयर्मन, व्यावसायिक अल्ट्रा-सायकलपटू, अथलिट आणि चित्रकार आहे. एकूण एक हजार पाचसे ४० किलोमीटर ८० तासात विभवला पूर्ण करावयाचे आहे.
त्याचबरोबर त्याला पंधरराहजार पाचशे मीटरचा चढ पार करावयाचा आहे. हा मार्ग अनेक वळणावळणाचा असून प्रतिकूल हवामानात पाऊस सुध्दा पडण्याची शक्यता आहे. पाठिमागून टेलविंड जोरजोराने वाहण्याची दाट शक्यता आहे.
स्पर्धेत जगभरातील अंदाजे दोन हजार स्पर्धक सहभागी झालेले आहेत. भारतातील एकूण स्पर्धक ११० आहेत. विभवचा स्पर्धा क्रमांक A-45 असून पाच दिवसाच्या अथक स्पर्धेत विभवला या स्पर्धेत भारतातर्फे यश मिळेल अशी अपेक्षा जनता बाळगून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.