esakal | उत्तम गुण मिळवूनही यशाला 'ती' पारखीच; दहावी निकालाच्या दिवशी शिक्षक, पालक भावूक
sakal

बोलून बातमी शोधा

vaishnavi

यशाचा आनंद घेण्यापूर्वी 'ती' जगातून केव्हाच निघून गेली...

sakal_logo
By
राजेंद्र बच्छाव

इंदिरानगर (नाशिक) : दहावीचा निकाल लागला..येथील सर्वच शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. अनेक विद्यार्थी त्यांच्या यशाचा आनंद उपभोगत आहे. एकीकडे चांगले गुण मिळाले म्हणून विद्यार्थ्यांच कौतुक होत आहे. तर दुसरीकडे मात्र उत्तम गुण मिळवून यशाचा आनंद घेण्यापूर्वीच विद्यार्थीनी वैष्णवी या जगातच हयात नव्हती... (Vaishnavi-bhamre-died-before-success-of-ssc-result-jpd93)

मृत्यू झालेली वैष्णवी विद्यालयात दुसरी

२८ जूनला मृत्यू झालेल्या डे केअर सेंटर शाळेची राज्य पातळीवरील खेळाडू वैष्णवी भामरे हिने ९६.२० टक्के मिळवत विद्यालयात दुसरी आली. तिच्या यशाचा आनंद घेण्यासाठी ती स्वतःच नसल्याने तिचे पालक, ती राहत असलेल्या कलानगर येथील अथर्व दर्शन सोसायटीचे रहिवासी, शिक्षक भावुक झाले होते. वैष्णवीने थ्रो बॉल, सॉफ्टबॉल आणि बेसबॉल खेळात राज्यपातळीवर प्रतिनिधित्व केले होते. प्राथमिक शिक्षक भगवंत भामरे यांची ती कन्या होती. दरम्यान, शाळेचा सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला. ज्ञानेश्वरी धोंगडे आणि शांभवी पारखी (९७.८०) प्रथम, वेदिका सागर (९४.२०) तृतीय आला. संस्थेचे अध्यक्ष ॲड. ल. जी. उगावकर, सचिव गोपाळ पाटील, ॲड. अंजली पाटील, मुख्याध्यापक शरद गिते आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. गुरुगोविंद सिंग विद्यालयात सानिका कासार (९६), स्नेहा पाटील (९४.८०), आयर्न चौधरी, दिव्या जाधव यांनी ९४.६० टक्के गुण मिळवत अव्वल येण्याचा मान मिळवला.

संस्थेचे अध्यक्ष बलबीरसिंग छाब्रा, उपाध्यक्ष हरजितसिंग आनंद, सचिव कुलजितसिंग बिर्दी, मुख्य अधिकारी परमिंदरसिंग, प्राचार्या ज्योती सामंता, मुख्याध्यापिका सुनीता प्रसाद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पाथर्डी फाटा येथील धनलक्ष्मी माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. साक्षी यंदे (९६.६०) प्रथम, कृत्तिका जाधव (९५) द्वितीय, तर समिधा कातोरे (९३.२०) तृतीय आली. संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे आणि सचिव ज्योती कोल्हे यांनी अभिनंदन केले. सुखदेव विद्यालयाचा निकालही १०० टक्के लागला. काजल सोनवणे (९१.४०), पूनम ठेंगे (८७.२०), सचिन गातवे (८१.८०) अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले. संस्थेच्या अध्यक्षा रत्नाबाई काळे, सचिव संजय काळे, मुख्याध्यापक बाबासाहेब खरोटे आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. जाजू विद्यालयाचाही निकाल शंभर टक्के लागला. पूजा देवरे (९७.८०), मयूर कवडे (९६.६०) आणि राजेश्वरी आहिरे (९५) अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय आले. संस्थेचे अध्यक्ष रमेश जाजू, सहचिटणीस चंद्रावती नरगुंदे आणि मुख्याध्यापक अजय पवार आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा: सावकी येथे नियतीचा आघात; भिंत कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

एमएसबीचा २६ व्या वेळी १०० टक्के निकाल

द्वारका येथील एमएसबी विद्यालयाने तब्बल २६ व्या वेळी दहावीचा शंभर टक्के निकाल लावून दाखवत परंपरा कायम ठेवली. अलिअसगर बोहरी (९०.८०), जमीला बोहरा (९०.६०), तर खदिजा परदावाला (८८. ८०) विद्यालयात अव्वल आले. अलिअसगरने गणितात शंभरपैकी शंभर गुण मिळवले. विद्यालयाचे सचिव जोएबभाई मोगरावाला, मसूल जुजर हैदरी, मुख्याध्यापिका मुनिरा इंदोरवाला यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. राजेंद्र बच्छाव, कुरेश आरिफ, सीमा पाटील, अमोल जाधव, वनिता उबाळे, मिलिंद भांडारकर, राहुल गंगवाणी आदींनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा: मनविसेची जबाबदारी दिल्यास स्विकारणार - अमित ठाकरे

loading image