Valentines Week 2023 : ‘व्हॅलेंटाइन वीक’ फीव्हर! महाविद्यालयीन युवकांमध्ये उत्साह

Valentines Day 2023
Valentines Day 2023esakal

नाशिक : तरुणाईला सर्वाधिक आकर्षण असलेल्या ‘व्हॅलेंटाइन वीक’ ला मंगळवार (ता. ७) पासून ‘रोझ डे’ पासून प्रारंभ झाला. त्यानिमित्त लाल गुलाबासह चॉकलेट हॅम्पर भेट म्हणून देत मित्र, मैत्रिणींनी व्हॅलेंटाईनची सुरवात केली. महाविद्यालयांसह कॉलेज रोडवर तरुणांचा उत्साह अधिक दिसून आला. तरुणांमध्ये सध्या क्रिस्टल हार्ट आणि क्रिस्टल रोझची सर्वाधिक क्रेझ दिसून येते. (Valentines Week 2023 Fever Enthusiasm among college youth nashik news)

तरुणांच्या मागणीनुसार बाजारात विविध प्रकारचे गिफ्ट उपलब्ध झाले आहेत.
तरुणांच्या मागणीनुसार बाजारात विविध प्रकारचे गिफ्ट उपलब्ध झाले आहेत.esakal

फेब्रुवारी महिना म्हटले, की तरुणांना ‘व्हॅलेंटाइन डे’ चे वेध लागतात. मंगळवारी पहिल्याच दिवशी महाविद्यालयांमध्ये मित्र, मैत्रिणींना गुलाब भेट देत या सप्ताहाची सुरवात झाली. रेड गुलाब भेट देऊन आपले प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.

त्यामुळे लाल गुलाबाच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे गुलाबाचे दर १० ते १५ रुपयांनी वाढल्याचे फूल विक्रेत्यांनी सांगितले. गुलाबाचे फूल हे वेगवेगळ्या रंगात असते. त्यामुळे हे फूल देणारी व्यक्ती त्याच्या रंगानुसार आपले प्रेम आणि भावना व्यक्त करते.

तरुणांच्या मागणीनुसार बाजारात विविध प्रकारचे गिफ्ट उपलब्ध झाले आहेत. यात चॉकलेट हॅम्पर, चॉकलेट बुके, हार्टशेप लॉली, गोल्डन, रेड, पिंक, पर्पल रोझ, क्रिस्टल हार्ट, रोझ यांचा समावेश आहे.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Valentines Day 2023
Valentine Day 2023 : 'या' 4 इस्लाम राष्ट्रांत 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्यास मनाई
क्रिस्टल हार्ट
क्रिस्टल हार्टesakal

असे घ्या गिफ्ट

चॉकलेट हॅम्पर: ९९ ते १०००रुपये

चॉकलेट बुके : ५० ते १००० रुपये

हार्टशेप लॉली : ९० ते ५०० रुपये

गोल्डन, रेड, पिंक, पर्पल रोझ : १०० ते ५००

चॉकलेट हार्ट बुके : १००० ते ५००० रुपये

चॉकलेट गिफ्ट पॅकिंग : ५०० रुपये

किचन टेडी : ५० ते २५० रुपये

क्रिस्टल हार्ट, रोझ : ९० ते ३०० रुपये

Valentines Day 2023
Valentine Week List 2023 : व्हॅलेंटाईन वीकमध्ये कधी कोणता दिवस माहितीये?

आज प्रपोझ डे

बुधवारी (ता. ८) प्रपोझ डे असल्याने आवडत्या व्यक्तीला मनातील गोष्ट सांगण्यासाठी ८ फेब्रुवारीचा दिवस उत्तम ठरतो. प्रपोज करताना तुम्ही केक, फूल, एखादी रिंग किंवा त्या व्यक्तीची आवडती वस्तू देऊ शकता. त्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या आकर्षक वस्तूही उपलब्ध आहेत.

"तरुणांनी यंदा क्रिस्टल हार्ट आणि रोझची सर्वाधिक पसंती दिली आहे. जास्त खर्च न करताही आकर्षक वस्तु म्हणून त्याला पसंती मिळत आहे."- रमेश दरयानी, विक्रेते, मोर इंप्रेशन

Valentines Day 2023
Jalgaon News : Valentine's Day साठी तरुणाई होतेय सज्ज; भेटवस्तूंची रेलचेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com