Nashik News : वणी कळवण रस्त्यावर अपघात; एक ठार, एक गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Nashik News : वणी कळवण रस्त्यावर अपघात; एक ठार, एक गंभीर जखमी

वणी (नाशिक) : वणी - कळवण रस्त्यावर पायरपाडा गावा जवळ दुचाकी व मारुती व्हॅन यांच्यात समोरा समोर धडक होवून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला आहे. सोबत असलेला गंभीर जखमी झाला आहे. (Vani Kalwan road accident one killed One seriously injured Nashik News)

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

शनिवार, ता. २५ मार्च रोजी सांयकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान दुचाकी नं. एम एच १५ एफ ई १४०२ वरुन रंगनाथ रामदास चारोस्कर वय ३५ रा. जोपुळ, ता. दिंडोरी व त्यांच्या सोबत असलेल् सहदुचाकीस्वार धोंडीराम बाळु सताळे रा. देवपुर, निफाड वय ३० हे दोघे नांदुरी गडाच्या दिशेने जात असतांना समोरुन येणारी मारुती व्हॅन नं. एम एच ०४ एफ एफ १०४३ यांच्यात समोरा समोर धडक झाली.

यात दुचाकीस्वार रंगनाथ चारोस्कर यांचा जागीच मृत्यु झाला. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील दोघांना जोराचा फटका बसला दुचाकीस्वार हा व्हॅन च्या काचेवर आदळुन रस्त्यावर पडला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यु झाला. जखमीला तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

त्याला गंभीर दुखापत असल्याने नाशिक येथे पाठविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळावर पोहचले पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. वणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास पोलीस राऊत व भोये करीत आहे.

टॅग्स :NashikAccident Death News