esakal | सुख वा दुःखाच्या प्रसंगी घरातील सदस्यांचीच उपस्थिती; वाणी समाजाचा परंपरेला फाटा

बोलून बातमी शोधा

vani samaj

सुख वा दुःखाच्या प्रसंगी घरातील सदस्यांचीच उपस्थिती; वाणी समाजाचा परंपरेला फाटा

sakal_logo
By
प्रशांत कोतकर

नाशिक : कोरोनामुळे समाजमन, चालीरीती, रूढी, परंपरेवर बराच परिणाम होत असून, साथीच्या आजारात केवळ माणूस जगला पाहिजे यासाठी विविध समाजघटक पुढे येत आहे. यासाठी परंपरा, रूढीला फाटा देऊन नवीन मानवी हिताच्या संकल्पना मांडल्या जात आहे. नाशिक जिल्हा लाडशाखीय वाणी समाज संघटनेने सुख वा दुःखाच्याप्रसंगी घरातील सदस्या व्यतिरिक्त कुणालाही निमंत्रित करणार नाही, कुणी बोलावले तरी जाणार नाही, शुभकार्ये, दुःखद प्रसंगातील कोणतेही विधी सद्य:परिस्थितीत न करता काही महिने लांबणीवर टाकण्याचा एकमुखी ठराव करून कोरोना महामारीपासून वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा: गाजरवाडीची कृषिकन्या गाजवणार युद्धभूमी! बनली तालुक्यातील पहिली महिला फौजी

कोरोनाला आळा घालण्यासाठी वाणी समाजाचा ठरावाद्वारे परंपरेला फाटा

कोरोनाच्या संसर्गाने ४०० दिवसांचा टप्पा पार केला आहे. नागरिकांनी स्वातंत्र्याचा स्वैराचार करीत दुसऱ्या लाटेला आमंत्रण दिले. कोणतेही नियम न पाळल्यामुळे आज ही परिस्थिती सर्वांवर ओढवली आहे. लाडशाखीय वाणी समाज संघटनेने निकटवर्तीय, आप्तेष्ट, हितचिंतक आणि स्नेही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सही सलामत सुटावे, यासाठी काही ठराव तथा निश्चय केला आहे. कोरोनामुळे अनेक परिवार उद्‌ध्वस्त झाले आहेत. अशा वातावरणतही अनेकजण सुख- दु:खप्रसंगी नातलग, परिचितांना भावनिक साद घालून निमंत्रण देतात. काही लोक कारणे देऊन जाण्याचे टाळतात, तर काही ‘तोंडावर तोंड पडते’ हा प्रचलित शब्द वापरून हजेरी लावतात. तिथेच कोरोनाला निमंत्रण मिळते. शुभ कार्य असो की दु:खद घटना, आजही साखरपुडा, शिष्टाचार, लग्न, अंत्यविधी, द्वारदर्शन, दहावे, बारावे, तेरावे, पेशंटला भेटायला जाणे यावर गांभीर्याने विचार करत नाही. लक्षणे नसलेला, लक्षणे असलेला, बाधित किंवा बरा झालेला रुग्ण आपल्याला केव्हा बाधित करतो, हे कळतच नाही. या सर्वाला अटकाव करण्यासाठी, रूढी, परंपरेला फाटा देऊन केवळ माणूस जगविण्यासाठी वाणी समाज संघटनेने पुढाकार घेतल्याचे संघटनेचे राजेश कोठावदे, सचिन बागड, विलास शिरोरे, नीलेश कोतकर आणि पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

हेही वाचा: कोरोनावर ‘गूळवेल’ ठरतेय अमृत! गुणकारी फायद्यांमुळे मोठी मागणी

असे झालेत ठराव...

- माझ्या घरच्या कुटुंब, परिवार, गावातील कोणत्याही सुख वा दुःखाच्याप्रसंगी घरातील सदस्या व्यतिरिक्त कुणालाही निमंत्रित करणार नाही, कुणी बोलावले तरी जाणार नाही.

- शक्यतोवर परिवारातील शुभकार्ये, दुःखद प्रसंगातील कोणतेही विधी काही महिने लांबणीवर टाकेल.

- अत्यावश्यकप्रसंगी विधी किंवा कार्य करावे लागल्यास केवळ घरातील १-२ सदस्यांसह पार पाडण्याचा संकल्प