Varah Jayanti : राज्यात वराह जयंती उत्साहात साजरी; बॉलिवूड, टीव्हीमधील दिग्गज कलाकारांनीही दिल्या शुभेच्छा

Varah Jayanti
Varah Jayantiesakal

Varah Jayanti : हिरण्याक्ष राक्षसाचा वध करून धर्माच्या रक्षणासाठी आणि मानव कल्याणासाठी पृथ्वीवर धर्माची पुनर्स्थापना करणाऱ्या जगाचा रक्षक श्री हरी विष्णूचा अवतार भगवान श्री वराह यांची जयंती रविवारी (ता. १७) राज्यात विविध जिल्ह्यांतील तालुका, वस्ती येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

संपूर्ण राज्यात वराह जयंती वेगळ्या स्वरूपात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली आणि राजकीय, अराजकीय व्यक्तींनीही सहभागी होऊन जयंती दिनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटून सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. (Varah Jayanti celebrated with enthusiasm in state Veteran actors from Bollywood and TV also given their best wishes nashik)

जयंतीत महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. मालेगावसह नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे वराहची वाजत-गाजत ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

ठिकठिकाणी होमहवनही करण्यात आले. विशेष म्हणजे बॉलिवूड, सिनेसृष्टीतल्या दिग्गज कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमाने शुभेच्छांचा वर्षाव केला.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, प्रसिद्ध गायक शबाब सब्री, प्रसिद्ध मराठी-हिंदी गायक सुरेश वाडकर, संगीतकार नीतेश श्रीवास्तव, दूरचित्रवाणी जाहिराती करणारे अभिनेता कांचन पगारे,

प्रसिद्ध संगीतकार व निर्माते विकास कौशिक, दूरचित्रवाणी अभिनेता प्रसिद्ध कलाकार निर्भय सिंग यांनीही वराह जयंतीच्या महाराष्ट्रवासीयांना शुभेच्छा दिल्या. आमदार नीतेश राणे आणि आमदार प्रसाद लाड यांनीही शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Varah Jayanti
Ganeshotsav 2023: फोटोफ्रेमच्या साहित्यातून नक्षीदार मखर! पर्यावरणपूरक, टिकाऊमुळे ग्राहकांचीही मागणी

राक्षसांच्या नाशासाठी...

भगवान विष्णूच्या १० अवतारांपैकी एक भगवान वराहचा अवतार असून, दहापैकी हा तिसरा अवतार आहे. वरुथिनी एकादशीच्या दिवशी परमेश्वराच्या वराह अवताराची पूजा केली जाते.

या दिवशी त्यांच्या जन्माची कथा ऐकल्याने पुण्यफल प्राप्त होते, असा मतप्रवाह आहे. राक्षसांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी वराह अवतार घेतला होता.

Varah Jayanti
Ganeshotsav 2023 : पावणे 2 लाख अगरबत्तीतून साकारला गणपती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com