Nashik News : थकबाकीदारांसमोर विविध विभागाने टेकले गुडघे; आता जप्ती वॉरंट बजावण्याचा नवा आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Court Order

Nashik News : थकबाकीदारांसमोर विविध विभागाने टेकले गुडघे; आता जप्ती वॉरंट बजावण्याचा नवा आदेश

नाशिक : थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महापालिकेकडून ७५ हजार ९६२ थकबाकीदारांना नोटीस बजावल्याचा दावा करण्यात आला. त्यातील नऊ हजार ४७ थकबाकीदारांकडून २४ कोटी २० लाख रुपयांची वसुली करण्यात विविध कर विभागाला यश आले आहे.

आता उर्वरित थकबाकीदारांपैकी १८१ थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावण्यात आले आहे. नोटीस बजावण्याचा विविध कर विभागाचा आणखीन एक प्रयोग फसल्याने या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Various departments knelt before arrears new order to execute seizure warrant Nashik News)

महापालिकेच्या एकूण उत्पन्नात जवळपास साडेचारशे कोटी रुपयांची तूट निर्माण झाली आहे. राज्य शासनाकडून जीएसटीचा हप्ता नियमित मिळाला. मात्र, नगररचना विभाग व विविध कर विभागाकडून घर व पाणीपट्टीची अपेक्षित वसुली झाली नाही.

विविध कर विभागाने थकबाकीदारांकडे वसुलीसाठी तगादा लावला. दिवाळीमध्ये थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. परंतु, राजकीय दबावापुढे आंदोलन मागे घेण्यात आले.

त्यानंतर टप्प्याटप्प्याने थकबाकीदारांना कारवाईच्या धमक्या देण्यात आल्या, मात्र फारसा फरक पडला नाही. त्यानंतर ७५ हजार ९६२ थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यातील ९ हजार ४७ थकबाकीदारांनी २४ कोटी २० लाख रुपये थकबाकी अदा केली. ६७ हजार थकबाकीदारांनी नोटिशीला उत्तर दिले नाही.

त्यामुळे नोटिशीच्या मुदतीत थकीत घरपट्टी अदा करण्यासाठी वॉरंट बसविण्याचा निर्णय घेतला आहे आतापर्यंत १८१ थकबाकीदारांना जप्तीचे वॉरंट बजावण्यात आले. यामध्ये सातपूर विभागात १५, पश्चिम विभागात ५१, पूर्व विभागात १५, पंचवटी विभागात ४८, सिडको विभागात २७, तर नाशिक रोड विभागात २५ असे नोटिशीचे वर्गीकरण आहे. मालमत्ता जप्त करून लिलावात काढल्या जाणार आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

हेही वाचा: Nashik News : कसबे सुकेणेत शेतीला पुदिना पिकाचा पर्याय; पुदिना पिकाचे शेकडो एकरवर क्षेत्र!

अशी आहे थकबाकीची स्थिती

शहरात ७५ हजार ९६२ थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यातील नऊ हजार ४७ थकबाकीदारांनी नोटिशीला उत्तर दिले. जवळपास ६७ हजार थकबाकीदारांकडे तीनशे नऊ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

महापालिकेची थकबाकीची व्याख्या

महापालिकेच्या विविध कर विभागाकडून कर अदा करण्याची नोटीस बजावली जाते. वास्तविक सदरची नोटीस म्हणजे देयकांची पावती असते. मात्र देयके अदा करणे शिल्लक असल्याने महापालिकेकडून थकबाकीदार म्हणून गणना होते. त्यामुळे थकबाकीदारांची संख्या पाऊण लाखांच्या आत दिसते.

हेही वाचा: Nashik News : 12 दिवसात 157 कुटुंबांचा पाणीपुरवठा खंडित; थकबाकी वसुलीसाठी कारवाई

टॅग्स :Nashiknmctax