
नाशिक : निसर्गप्रेमी सीमा नितीन तंगडपल्लीवार यांनी फुले-पानातून गणरायाची विविध रूपे साकारली आहेत. कलाकृती बनवल्यानंतर त्या त्यावर काव्य लिहितात. आतापर्यंत दीडशेहून अधिक कलाकृती त्यांनी साकारल्या आहेत. दरवर्षी गणरायाला वाहिलेल्या फुलांची आरासमधील फुलांमधून अनेक आकर्षक गणराया बनवले आहेत. (Various forms of Ganaraya made from flowers leaves Nashik Latest Marathi News)
‘मॉर्निंग वॉक'ला गेल्यावर रस्त्यात विविध रंगाची पाने पडलेली दिसली, की त्या उचलून घरी आणतात. त्यातून कलाकृती साकारतात. निसर्गात रमणे हा त्यांचा आवडता छंद असल्याने ‘बेस्ट आउट ऑफ वेस्ट' मधून अर्थात, पाला-पाचोळ्यातून निरनिराळे पक्षी आणि इतर कलाकृती त्या बनवत असतात.
झाडाच्या साली, गुलमोहोराची फुले, कांचनच्या वाळलेली पाने, पारिजातक, झेंडूची फुले, गुलाबाच्या पाकळ्या वापरून त्यांनी सुंदर गणराया साकारले आहेत. शाळकरी मुलांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून त्या कार्यशाळा घेतात. पडसाद मूकबधिरांची शाळा इथे पण त्यांनी मुलांना अशा वस्तू बनवण्यास शिकवले आहे.
"गणरायाचे धुमधडाक्यात आगमन झाले. ‘पर्यावरणाला जपा‘ हा संदेश देण्यासाठी मी टाकाऊतून टिकाऊचा प्रयोग करत कलाकृती बनवत असते. निसर्गातली कुठलीच गोष्ट वाया जात नाही. भविष्यात विविध शाळेत कार्यशाळा घेत या कलेचा प्रसार करायचा आहे. एक प्रदर्शन भरवण्याची इच्छा आहे." - सीमा तंगडपल्लीवार (निसर्गप्रेमी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.