देवळा- ‘वसाका’ सुरू व्हावा, यासाठी कर्मचाऱ्यांनी रविवारी (ता.१५) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांची येवला येथील कार्यालयात भेट घेत त्यांना साकडे घातले. वसाका असाच बंद राहिला तर सभासद, शेतकरी व कामगारांच्या कष्टातून व घामातून फुललेला हा कारखाना धुळीस मिळेल.