esakal | व्यंकय्या नायडूंच्या 'त्या' वक्तव्याचा नाशिकमध्ये निषेध.. शिवभक्तांच्या भावना दुखावल्याबद्दल पुतळा दहन
sakal

बोलून बातमी शोधा

vyankayya naydu nishedh.jpg

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली. मात्र, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी 'जय भवानी जय शिवाजी' या घोषणेवर आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावर साक्षात त्यांच्या वारसांवरच आक्षेप घेतल्यामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांचा संताप उफाळून आला आहे.

व्यंकय्या नायडूंच्या 'त्या' वक्तव्याचा नाशिकमध्ये निषेध.. शिवभक्तांच्या भावना दुखावल्याबद्दल पुतळा दहन

sakal_logo
By
केशव मते : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली. मात्र, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी 'जय भवानी जय शिवाजी' या घोषणेवर आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावर साक्षात त्यांच्या वारसांवरच आक्षेप घेतल्यामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांचा संताप उफाळून आला आहे. नाशिकमध्येही शिवरायांचा अवमान केल्याचा निषेध करत शिवसेनेतर्फे व्यंकय्या नायडू यांना बडतर्फ करावे ही मागणी करत पुतळा दहन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे अजय बोरस्ते, विजय करंजकर ,महेश बडवे, डी.जी. सूर्यवंशी , योगेश बेलदार व शिवसैनिक उपस्थित होते.

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी  व्यंकय्या नायडू यांचं पोस्टर जाळलं.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलेलं हे फक्त शिवप्रेमींच्या आणि शिवभक्तांच्या भावना दुखावणारं असल्याने राज्यभरातून या विधानाचा निषेध केला जात आहे. व्यकंय्या नायडू यांच्या विधानामुळे राज्यभरातील पडसाद उमटताना दिसत आहेत. नाशिकमध्ये देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यंकय्या नायडू यांना जय भवानी जय शिवाजी अशा आशयाचे पत्र पाठवत या घटनेचा निषेध केला. तसेच नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन करत व्यंकय्या नायडू यांचं पोस्टर जाळलं. खासदार उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेतील शपथविधी नंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी जे वक्तव्य केलं हे माझं चेंबर आहे, कुणाचं घर नाही. या विधानावरून राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे.

(संपादन - ज्योती देवरे)

हेही वाचा >नाशिकला पवार साहेब आल्यानंतर सांगणार काय? कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था केविलवाणी.. तर मनसे कोमात!

हेही वाचा > धक्कादायक! 'त्या' क्षणाला न बायको आठवली न लेकरं...दुर्देवी घटना

loading image