Nashik Political News : शिंदे- ठाकरे गटांत शाब्दिक धुमश्चक्री; नाशिकमध्ये वाद पेटला!

Hemant Godse vs Sanjay Raut
Hemant Godse vs Sanjay Rautesakal

नाशिक : खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर केलेली टीका आणि नाशिकमधून लढण्याच्या दिलेल्या आव्हानानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेत खासदार हेमंत गोडसे यांना गद्दार संबोधत संजय राऊतांमुळेच दोनदा उमेदवारी मिळालेल्या गोडसेंनी त्यांना आव्हान देण्याऐवजी आम्हीच त्यांचे आव्हान स्वीकारतो, असे शिवसेना नेते जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत खासदार गोडसेंवर गद्दार आणि कृतघ्नपणाचे आरोप केले. यामुळे नाशिकमधील स्थानिक शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये चांगलेच धुमशान रंगले आहे. महापालिका निवडणुकींमुळे नजीकच्या काळात हा वाद चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत. (Verbal spat between Shinde Thackeray group Controversy broke out in Nashik Latest Political News)

शिवसेना नेते संजय राऊत हे शुक्रवारी (ता. ९) नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्या वेळी त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका करीत सीमाप्रश्‍नी आता मुख्यमंत्र्यांनी जलसमाधी घ्यावी, असे विधान करत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनाही लक्ष्य केले होते. गोडसे यांना मी विचारतही घेत नाही, असे सांगत त्यांनी गद्दारांनी पुन्हा निवडून यावे, असे आव्हान दिले होते. त्यावर काल गोडसे यांनी संजय राऊत यांनी नाशिकमधून निवडून दाखवावे, असे प्रत्युत्तर दिले होते.

त्यावर आज शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत खासदार गोडसेंवर टीका केली आहे. आमचे नेते मोठे आहेत, त्यांना कशाला आव्हान देता, नाशिक लोकसभा मतदारसंघातून तुमचे आव्हान मी स्वीकारतो, माझ्याविरुद्ध निवडणूक लढवा आणि विजयी होऊन दाखवा, असा प्रतिहल्ला आज श्री. करंजकर यांनी केल्याने दोन्ही गटांतील वाद आणखी पेटला आहे.

लोकसभेची नऊ वर्षांपूर्वी उमेदवारी कापली गेल्याच्या जुन्या जखमा ताज्या झालेल्या जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी तर गोडसे यांचा अगदी एकेरी भाषेत उल्लेख करीत, लोकसभा निवडणुकीचे थेट आव्हानच दिले. महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गिते, विलास शिंदे आदींच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेने केलेल्या प्रतीकात्मक तिरडी आंदोलनात खासदार गोडसे यांनी दिलेल्या खांदा आणि त्यांच्या प्रतिक्रियांचे जुन्या बातम्यांचे व्हिडिओ दाखविण्यात आले, हे विशेष.

First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

Hemant Godse vs Sanjay Raut
Nandurbar Crime News : कोपर्लीतून 42 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

कृतघ्न अन् गद्दारच...

श्री. करंजकर म्हणाले, खासदार गोडसे यांनी दिल्लीत संजय राऊत यांचे पाय धरल्यामुळे २०१४ ला त्यांना उमेदवारी मिळाली. मोठ्या मनाने मीसुद्धा पक्षाच्या हिताचा विचार करीत त्यांच्या विजयासाठी शिवसैनिक म्हणून काम केले. एकदा नव्हे, तर दोनदा उमेदवारी मिळालेल्या गोडसे यांना दहा वर्षांत एक काम करता आले नाही. नऊ वर्षांत त्यांनी कुठले काम केले. उलट त्यांनी भूमिपूजनाचे मोठे कार्यक्रम घेतलेल्या हेमाडपंती मंदिर, इलेक्‍ट्रिक लॅब, रेल्वेच्या चाकाचा कारखाना यांचे काय झाले. कांदा उत्पादक अडचणीत आल्यावर कितीदा संसेदत आवाज उठविला. केवळ निवेदन देण्यापलीकडे केले काय? ज्या राऊतांमुळे शिवसेनेत प्रवेश आणि दोनदा खासदार होता आले त्यांच्यावर टीका करीत अवहेलना केली आहे. यापुढे अजिबात टीका खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत अगदी एकेरी शब्दांत टीका केली. संजय राऊत हे मोठेच नेते आहेत, ते खूप दूर आहे. मीच नाशिकला गोडसेंना आव्हान देतो, असे सांगत एकप्रकारे रणशिंग फुंकले.

राऊतांची पोपटपंची ः गोडसे

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रविवारी (ता.४) गिरणारे (ता. नाशिक) येथे झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात खासदार हेमंत गोडसे यांनी संजय राऊतांना पोपटपंची म्हणत जे जनतेतून निवडून येत नाही, ते नेहमी झोपेतून उठले, का घरासमोर मिडीयाची वाट बघतात. रस्त्यावर बसणा-या ज्योतिषाकडे जसा पोपट असतो आणि तो एक चिठ्ठी काढतो तसे राऊतांचे असल्याचा घणाघात केला. विरोधकाच्या हाताला काम न राहिल्यानेच कायम वाटेल ते बोलत असल्याची टीका केली.

Hemant Godse vs Sanjay Raut
Nashik News : स्वामिनारायण मंदिरात समूह महाआरती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com