esakal | ज्येष्ठ गांधीवादी शिक्षणतज्ज्ञ प्रा. वासंती सोर यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Vasanti Sor

ज्येष्ठ गांधीवादी शिक्षणतज्ज्ञ प्रा. वासंती सोर यांचे निधन

sakal_logo
By
दत्ता जाधव

नाशिक : ज्येष्ठ गांधीवादी, सर्वोदयी विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. वासंती सोर (वय ८५) यांचे काल (ता.१८) रात्री साडेदहाच्या सुमारास पंडीत कॉलनीतील राहत्या घरी निघन झाले. त्यांच्या अंतीम इच्छेनुसार आडगावच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात देहदान करण्यात आले. (Veteran Gandhian leader educationist Vasanti Sor passes away)

नाशिकमधील सर्वोदय व जीवनउत्सव परिवाराच्या आधारस्तंभ असलेल्या वासंतीताईंनी आयुष्यभर खादी वापरत कुटुंबियांसह अन्य परिवाराला खादी वापरण्याचा आग्रह धरला. जुन्या पिढीतील निष्ठावान कार्यकर्ते व स्वातंत्र्यसैनिक श्रीधर व मालतीताई थत्ते यांच्या त्या कन्या होत. महात्मा गांधीजी यांनी स्थापन केलेल्या व आचार्य विनोबा भावे चालवत असलेल्या वर्धा येथील महिलाश्रमात त्यांचे बालपण गेले. आचार्य विनोबाजी भावे यांच्या सान्निध्यात शिकण्यची संधी त्यांना लाभले. विनोबांच्या भुदान चळवळीत त्या काही काळ सक्रीय होत्या. बालपणी महात्मा गांधींच्या मांडीवर बसण्याचे भाग्य लाभल्याचे त्या सांगत. त्यांनी संपूर्ण आयुष्य स्वतः कताई केलेल्या खादीचे वस्त्र व कपडे वापरले.

हेही वाचा: चित्रपटांना ओटीटी पर्याय, नाटकांना काय?, नाट्यकर्मींचा सवाल

सार्वजनिक जीवनात सक्रीय

एम.ए. एम.एड. झाल्यावर वासंतीताई नाशिमधील बी. एड. महाविद्यालयात अनेक वर्षे अध्ययनाचे काम केले. त्याच महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून त्या निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर सर्वोदय विचार, स्त्री शक्ती जागरण, खादी आदी विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण लिखाण केले. त्यांनी नाशिकमध्ये सूत कताई मंडळ स्थापन केले होते. हुतात्मा स्मारकात दरवर्षी अनेक कार्यकर्त्यांसह गांधी जयंतीला (२ ऑक्टोबर) मौनव्रवतात सुतकताई करत असल्याची आठवण वासंती दीक्षित यांनी सांगितली. त्यांच्या जाण्याने सर्वोदय परिवारासह जीवनउत्सव परिवार पोरका झाल्याची भावनाही सौ. दीक्षित यांनी व्यक्त केली.

(Veteran Gandhian leader educationist Vasanti Sor passes away)

हेही वाचा: मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात दरड कोसळली

loading image