esakal | चित्रपटांना ओटीटी पर्याय, नाटकांना काय?, नाट्यकर्मींचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

Theater artists

चित्रपटांना ओटीटी पर्याय, नाटकांना काय?, नाट्यकर्मींचा सवाल

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना खबरदारी म्हणून लावलेले निर्बंधही हटविण्यात येत आहेत. निर्बंध शिथिल झाल्यानंतर दीड महिन्यांनंतरही नाट्यगृहांना परवानगी मिळाली नाही. त्यामुळे नाट्यगृहांबरोबरच नाटकाचे दिग्दर्शक, निर्माते, लेखक, कलाकार कलावंतांनी नाट्यगृह सुरू करावेत, अशी आर्त हाक दिली आहे. निर्बंध अजूनही कायम असतील, असे दिसत आहे. राज्यात चित्रीकरणालाही परवानगी देण्यात आली आहे. चित्रपटांना ओटीटी हा पर्याय आहे नाटकांना काय, असा सवाल नाट्यकर्मी करताना दिसत आहेत. (play artists have demanded the reopening of closed theaters in Lockdown)

गत वर्षापासून अनेक नवीन नाटकांचे प्रोजेक्ट रखडले आहेत. काही संस्थांनी पहिल्या अनलॉकमध्ये तयारी सुरू केली होती; परंतु पुन्हा लॉकडाउन लागले. त्यामुळे वर्षभरापासून नवीन नाटक आलेले नाही. प्राजक्त देशमुख यांच्या ‘देवबाभळी’ नाटकाचे ३५० प्रयोग झाले असून, आतापर्यंत ५०० प्रयोगांचा टप्पा गाठला असता; हीच परिस्थिती इतर नाटक संस्थांची आहे. नाट्यगृहांवर अनेक कलावंत अवलंबून आहेत. ५० टक्के क्षमतेने परवानगी देऊन कलाकारांना संधी उपलब्ध करून द्यावी. नाटकांना परवानगी देण्याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करावा. गेल्या तीन महिन्यांपासून नाट्यगृह बंद असल्यामुळे देखभाल खर्चही मोठा लागणार आहे.

अनलॉकनंतर कालिदासमध्ये केवळ १२ प्रयोग

महाकवी कालिदास कलामंदिरात वर्षभरात साधारण २०० प्रयोग होतात. परंतु पहिल्या लाटेनंतर नोव्हेंबरमध्ये नाट्यगृह सुरू झाल्यानंतर कालिदासचा पडदा जानेवारीत उघडला. जानेवारीत नाटकाची आठ महिन्यांनंतर तिसरी घंटा वाजल्यानंतर मार्चपर्यंत ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत केवळ १२ प्रयोग झाले. वर्षभरात सर्वाधिक प्रयोग उन्हाळी सुटीत होतात. बालनाट्यही याच दरम्यान होतात. गत वर्षात अनेक स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या लाटेत लावण्यात आलेले निर्बंध कधी शिथिल होतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात दरड कोसळली

दुसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल केले आहेत. अनेक ठिकाणी गर्दी होत असून, हॉटेलमध्येही ५० टक्के गर्दीला परवानगी देण्यात आलेली आहे. नाट्यगृहांना परवानगी मिळाल्यास दुसऱ्या दिवशी लगेच नाटकांचे प्रयोग सुरू होतील असे नाही. नाट्यगृह लवकर सुरू करावेत, दक्षता पाळून प्रयोग करण्यात येतील.

-प्राजक्त देशमुख, दिग्दर्शक

गेले दोन वर्ष नाट्यगृहे बंद आहेत. परफॉर्मिंग आर्ट रंगमंचावर सादर होतात. चित्रपट, सिरियल, मुलाखती यांना डिजिटल माध्यम हे पर्याय सक्षमपणे उभे असले तरी लोककला, नाटक, नृत्य, संगीत आदी कलांना दुसरा पर्याय नाही. निर्बंध शिथिल झाल्यानंतर सार्वजनिक उपक्रमांसह बाजारपेठ खुली झाली असून, मोठी गर्दी दिसत आहे. कोरोनासोबत जगावे लागेल. किती दिवस बंद ठेवणार, हा प्रश्‍न आहे.

-सचिन शिंदे, दिग्दर्शक

हेही वाचा: काका-आण्णा ड्रायव्हींग सिटवर! २०२४ च्या रेसची आतापासूच मोर्चेबांधणी

loading image