व्हिक्टोरिया पूल अजूनही दणकट; VJTIचा स्मार्टसिटी कंपनीला अहवाल

Victoria Bridge latest marathi news
Victoria Bridge latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : गोदावरी नदी पुलावरील रामसेतू पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट (Structural audit) करण्याच्या सूचना मिळाल्यानंतर सर्वात जुना पूल असलेल्या व्हिक्टोरिया पुलाच्या क्षमतेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु, स्मार्ट सिटी (Smart city) कंपनीला नुकताच व्हीजेटीआय संस्थेचा अहवाल प्राप्त झाला.

किरकोळ दुरुस्ती वगळता ब्रिटिशकालीन पूल सुस्थितीत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा व्हिक्टोरिया पुलाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. (Victoria Bridge is good condition VJTI Reported to SmartCity Company nashik Latest Marathi News)

गोदावरीला सातत्याने पूर येत असल्याने नदीवर बांधलेल्या पुलाच्या क्षमता तपासणीचा मुद्दा समोर आला आहे. पन्नास वर्षांहून अधिक जुना असलेल्या जुन्या रामसेतू पुलाला तडे गेले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त रमेश पवार, जिल्हाधिकारी गंगाथरन. डी व स्मार्टसिटी मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांच्यासह स्थळ पाहणी केली. या वेळी आयुक्त पवार यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या.

त्यापूर्वी महापालिकेच्या बांधकाम विभागानेदेखील यापूर्वी पवई आयआयटीकडे पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटची प्रस्ताव सादर केला होता. परंतु, त्या संदर्भातील अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. गोदावरी नदीवर महापालिका हद्दीत छोटे- मोठे जवळपास चौदा पूल आहे. हाय फ्लड लाईन (एचएफएल) अर्थात सर्वोत्तम पूरपातळीत सहा मोठे पूल आहे.

चोपडा, होळकर व व्हिक्टोरिया, गाडगे महाराज, कन्नमवार व तपोवन या पुलाचा समावेश होतो. यातील सर्वात जुना पूल व्हिक्टोरिया आहे. या पुलाला जवळपास ११० वर्षे झाली आहेत. नाशिकमध्ये पहिला टोल या पुलावरच लागला होता.

पंधरा वर्षांपूर्वी ब्रिटिश ॲम्बेसीकडून पुलाला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याचे पत्रदेखील प्राप्त झाले आहे. त्यानंतर पुलाला अनेकदा पुराचे तडाखे बसले. त्यामुळे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी होती.

स्मार्टसिटी कंपनीमार्फत गोदावरी सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यातून पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिटच्या सूचना होत्या. त्यानुसार व्हीजेटीआयचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून, त्यात पूल दणकट असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Victoria Bridge latest marathi news
Nashik : गणेशमूर्ती कारागिरांना महापालिकेकडून नोटीस

किरकोळ दुरुस्ती

व्हिक्टोरिया पुलाच्या पिलरवर उगवलेली झाडी तोडणे, सिमेंटच्या ग्रीलची मजबुती तपासणी, अवजड वाहनांना प्रवेश नाकारणे, चिरा बुजविणे या किरकोळ दुरुस्ती अहवाल सुचविण्यात आली आहे. पूल अजून किती दिवस टिकेल याबाबत स्पष्टता नसली तरी पूल अद्यापही दणकट स्थितीत असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

"व्हीजेटीआयच्या अहवालात व्हिक्टोरिया पुलाला कुठलाच धोका नसल्याचे स्पष्टीकरण आहे. किरकोळ दुरुस्ती सुचविल्या असल्या तरी त्यासंदर्भात मार्गदर्शन मागवून निर्णय घेवू."

- सुमंत मोरे, सीईओ, स्मार्टसिटी कंपनी.

Victoria Bridge latest marathi news
Rain Update : आदिवासी भागासह गंगापूर धरण पाणलोटात मुसळधार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com