Nashik : जागरुन नागरीकांनी हरवलेल्या चिमुकल्याला सोपवले पालकांकडे

vigilant citizens with child
vigilant citizens with childesakal

मखमलाबाद (जि. नाशिक) : वर्दळ असणाऱ्या पेठ रोडवर चार वर्षाचा चिमुकला भटकत असल्याचे दिलीप रसाळ यांनी पाहिले. या चिमुकल्याला बोलता येत नसल्याने तो घाबरलाही होता. वाहनांना आडवा पळत असल्याने अपघात होण्याचीही शक्यता होती. (vigilant citizens handed over missing child to parents Nashik Latest Marathi News)

vigilant citizens with child
Dhule News : राज्यात 4 हजारावर Hemophilia रुग्णांच्या जिवाशी खेळ!

मात्र, येथील जागरूक नागरीकांनी इंद्रप्रस्थनगर रस्त्यावर दिसलेल्या चिमुकल्याला जवळ घेत विचारपूस केली. परिसरात विविध ठिकाणी चौकशी करत या मुलाच्या पालकांचा शोध सुरू केला. पोलिसांनाही घटनेबाबत कळविण्यात आले. यानंतर त्या मुलाच्या पालकांचा शोध लागला. याच परिसरात गोठ्यावर मजुरी करणाऱ्या मजुराचा हा मुलगा असल्याचे समजले.

मजुर झोपला असताना हा मुलगा घराबाहेर पडला. पालकांशी संपर्क करून मुलाला वडीलांच्या ताब्यात दिले. नागरिकांच्या सजगतेमुळे मजुराचा मुलगा काही तासातच पोलिसांच्या सहकार्याने मखमलाबाद येथील नागरिक दिलीप रसाळ व मित्रांनी मिळवून दिल्याने परिसरात त्यांचे अभिनंदन होत आहे.

vigilant citizens with child
SAKAL Impact News : अभोणा- नांदुरी रस्त्याला 2 कोटींचा निधी

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com