नाशिक- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी केलेले व पक्ष धोरणाबाबत नाराज असलेले माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी अखेर रविवारी (ता. २९) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी विलास शिंदेंसह नाशिकच्या सात ते आठ माजी नगरसेवक, विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.