esakal | बळीराजा तुझी पदोपदी परिक्षाच! काढणीला आलेल्या पिकाची अवकाळीने उडाली दाणादाण
sakal

बोलून बातमी शोधा

12332.jpg

या द्राक्षबागा विकण्यासाठी पूर्ण तयार झाल्या असून, पावसामुळे द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ज्या द्राक्षबागेतील घड पेपरने झाकलेले आहे, आशा घडांमध्ये पाणी गेल्यास मोठे नुकसान झाले आहे.

बळीराजा तुझी पदोपदी परिक्षाच! काढणीला आलेल्या पिकाची अवकाळीने उडाली दाणादाण

sakal_logo
By
रामदास कदम

दिंडोरी (नाशिक) : तालुक्यात शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी सहाला अवकाळी पावसाने झोडपले. यात द्राक्ष, गहू, हरभरा आदी रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात पूर्व भागात द्राक्षाची नव्वद टक्के द्राक्षशेती आहे. पावसाने सायंकाळी सहाला चांगलेच झोडपले. 

शेतकरी सापडला आर्थिक अडचणीत 

गुरुवारी रात्री आठला पाऊस झाला. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर शेतकरी द्राक्षशेतीत बुरशीजन्य औषधांची फवारणी करत होते. पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मोठ्या प्रमाणात मणीगळ व घडकुज होऊन बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. काही शेतकऱ्यांनी घडांना कागद लावले आहेत, तेही पावसामुळे ओले झाले आहेत. पश्चिम पट्ट्यातही गहू हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत मोहाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी सचिन जाधव ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, की या पावसाने शेतकऱ्यांचा औषधांची फवारणी करण्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सध्या द्राक्ष शेतीची कामे शेवटच्या टप्प्यात आली असताना निसर्ग ही सध्या साथ देत नसल्याने द्राक्षशेती सध्या अडचणीची ठरत आहे. 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

द्राक्षमण्यांना तडे 

दिंडोरी तालुक्यात आर्ली छाटलेल्या द्राक्षबागामध्ये पाणी उतरून पूर्ण साखर आलेली आहे. या द्राक्षबागा विकण्यासाठी पूर्ण तयार झाल्या असून, पावसामुळे द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ज्या द्राक्षबागेतील घड पेपरने झाकलेले आहे, आशा घडांमध्ये पाणी गेल्यास मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे पेपर जास्त प्रमाणात ओला झाल्यास द्राक्ष मण्यावर काळे डाग पडतात. कोरोनामुळे मागील हंगामात द्राक्ष बागायतदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतक-यांना भांडवलदेखील तयार करता आलेले नाही. शेतक-यांनी द्राक्ष फेकून दिलेले असून पुन्हा चालू वर्षी अवकाळीने फटका बसत असल्याने मोठे आव्हान ठरले आहे. सध्याच्या परिस्थितीत द्राक्षबागांना पूर्ण खर्च करून झालेला आहे.  

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

loading image