Latest Marathi News | Malegaon : साथीच्या आजाराने नागरिक हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral infections

Malegaon : साथीच्या आजाराने नागरिक हैराण

मालेगाव : शहरात साथीच्या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. येथील शासकीय व खासगी दवाखाने रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. येथे लहान मुले व नागरिक सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोके, डेंग्यू या साथीच्या आजाराने त्रस्त झाले आहे. शहरात नेहमीच स्वच्छतेचा बोजवारा असतो. महापालिका प्रशासनातर्फे वेळेवर औषध फवारणी व कचरा उचला जात नसल्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शहरात हद्दवाढ झालेल्या भागात पाण्याचे डबके साचल्याने डासांच्या संख्येत वाढ झाली आहे.

शहरातील मोकळ्या भुखंडावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. या कचऱ्यावर डुकरे, कुत्रे, मोकाट जनावरे यांचा वावर वाढला आहे. तोच कचरा कुत्रे- डुकरांच्या माध्यमातून कॉलन्यांमध्ये येतो. त्यामुळे येथे व्हायरल फिवरच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. आजारांमुळे लहान मुले, वृद्धांना सर्वात जास्त त्रासाचा सामना करावा लागत आहे. येथील दवाखान्यात डेंग्यूच्या रुग्ण संख्येतही वाढ होताना दिसत आहे. सामान्य रुग्णालयात दररोज सुमारे ६०० रुग्णांची तपासणी होत आहे. खासगी रुग्णालये फुल्ल झाले आहेत.

हेही वाचा: ‘काय सांगू भो... रस्त्यावर चालणंही कठीण व्हई बसणं! खड्डे बुजणार कधी...?

शहरासह हद्दवाढ झालेल्या काही भागांमध्ये स्वच्छतेचा प्रश्‍न नेहमीच ऐरणीवर असतो. या भागात गटारी, डासांची औषध फवारणी होत नाही. त्यामुळे रोगराईत वाढ झाली आहे. कॅम्प भागातील अनेक कॉलनींमध्ये डास प्रतिबंधक औषधांची फवारणी होत नसल्याने डासांच्या उत्पत्ती वाढली आहे. ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने डेंग्यूचे डास वाढले आहेत. शहरात महापालिकेतर्फे स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

''नागरिकांनी बाहेर फिरताना मास्कचा वापर करावा. अन्न स्वच्छ खावे. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुलांची व वृद्धांची काळजी घ्यावी.'' - डॉ. संदीप खैरनार, वैद्यकीय अधिकारी, सामान्य रुग्णालय, मालेगाव

''महापालिकेत प्रशासक राज आहे. स्वच्छता विभागाचा कर्मचाऱ्यांवर संबंधित अधिकाऱ्याचा वचक राहिला नाही. रस्त्यावर साफसफाई करणाऱ्या महिलांकडे टोपली नसल्याने रस्त्याच्या कडेला कचरा लावतात. पुन्हा दोन ते तीन तासात कचरा जैसे थे अशी परिस्थिती होते. काही भागात डासांची औषध फवारणी केल्यानंतर महिनाभर फवारणी करणारे ट्रॅक्टर फिरकत नाही.'' - जगदीश गोऱ्हे, संस्थापक, वंदे मातरम्‌ संघटना, मालेगाव

हेही वाचा: नाशिक : रोजंदारी कर्मचाऱ्यांचे वेतन 5 महिन्यांपासून रखडले

Web Title: Viral Infections Patients Increase In Malegaon Nashik District News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :MalegaonNashikdesease