बालपणापासून त्याला पारितोषिकांचा लळा; नेपाळमध्ये रोवला झेंडा

बालपणापासून त्याला पारितोषिकांचा लळा; नेपाळमध्ये रोवला झेंडा
winners
winnersesakal

अंबासन, (जि.नाशिक) : आजकालची चिमुकली...त्यांची अफाट स्मरण शक्ती...आईवडीलांना विचार करायलाच लावणारी...वयाच्या नवव्याच महीन्यात चिमुकल्याने महाराष्ट्र शासनाकडून 'सेल्फी विथ ट्री' स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून तालुक्याची मान उंचावली एवढ्यात न थांबता आपल्या मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धेतही आजवर अनेक बक्षीसे पटकावत तालुक्याचे नाव लौकिक केले आणि नेपाळमधील स्पर्धेतही झेंडा रोवला.

कधी घनदाट जंगलात तर कधी वनपरिक्षेत्रातील हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कामाचा ठसा उमटवत विशाल दुसाणे हे कर्तव्य बजावत आहेत. ताहराबाद (ता.बागलाण) येथील वनपरिक्षेत्रात कार्यरत असलेले श्री. दुसाणे यांचा मुलगा विराट दुसाणे याने वयाच्या नवव्याच महीन्यात १ जुलै २०१६ मध्ये शासनाचा दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत 'selfie with tree' या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत महाराष्ट्रातील तेवीस स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. यात नाशिक जिल्ह्यातील एकमेव कमी वयोगटातील विराटने बाजी मारली अन् तेव्हापासून आजतागायत अनेक बक्षीस पटकावत तालुक्यात ठसा उमटवत आहे. त्याने आजपर्यंत 'show and tell' यात प्रथम क्रमांक पटकाला. त्यानंतर फॅन्सी ड्रेस, वक्तृत्व स्पर्धा, वयाच्या चौथ्या वर्षी मालेगाव व नाशिक येथे झालेल्या स्केटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल पटकावले.

winners
शरीर सौष्ठवपटूने उंचावली पोलिस विभागाची मान

यावर्षी वयाच्या सहा वर्षांत पदार्पण करीत नुकतेच नेपाळमधे झालेल्या सातव्या अंतरराष्ट्रीय नेपाळ गेम्स हिरोज् कप-२०२२ स्पर्धेत सहभाग नोंदवून गोल्ड मेडल पटकावत तालुक्यात नावलौकिक केले. स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी तालुक्यात प्रवेश करताच ठिकठिकाणी फलक तसेच फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले होते. स्पर्धकांना प्रशिक्षक जावेद शहा यांचे मार्गदर्शन लाभले. राजकीय, सामाजिक व सर्वच क्षेत्रातून स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी

१७ वर्षांखालील अॅथलेटिक्स प्रकारात : पीयूष बैताडे - सुवर्णपदक, पृथ्वी परदेशी - रौप्यपदक व कराटे : गणेश कापडणीस - सिल्व्हर मेडल,

१४ वर्षांखालील गटात : लौकिक मोरे - रौप्यपदक,

१२ वर्षांखालील गटात : नक्षत्र पवार - रौप्यपदक,

स्केटिंग स्पर्धेत : १४ वर्षांखालील गटात : आर्यन सोनवणे - सुवर्णपदक, केतन आहेर - रौप्यपदक, आयुष देवरे - सिल्व्हर मेडल,

१२ वर्षांखालील गटात : विजय सोनवणे, राणा राजवीर सपकाळ, यश कापडणीस - सुवर्णपदक,

८ वर्षांखालील गटात : विराट दुसाणे - सुवर्णपदक व कराटे स्पर्धेत : कुणाल बागुल - सुवर्णपदक यांनी यश संपादन केले.

winners
दोस्तीत दोस्ती अन् कुस्तीत कुस्ती! माऊली अन् सिकंदर कुस्तीप्रेमींसाठी ठरले हृदयकेसरी

''विराट ९ महीन्याचा असतांनाच त्याने स्पर्धेत नावलौकिक केले याचा आम्हाला अभिमान आहे. या पुढील काळातही तालुक्याचे नाव नक्कीच उंचावेल.'' - विशाल दुसाणे, विराटचे वडिल, सटाणा.

''प्रशिक्षक तसेच शाळेतील गुरुजन बरेच स्तुत्य उपक्रम राबवून चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन विविध खेळात अव्वल स्थान पटकावत आहेत. मुलही हिरीरीने सहभाग घेऊन आईवडिलांचे स्वप्न साकार करत आहेत. - सचिन सपकाळ, राणा राजवीरचे वडील, नामपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com