VDH26B02659
वाडिवऱ्हे ः अपघातग्रस्त कार.
२०-१
वाडिवऱ्हे परिसरात दोन
अपघातात सात जखमी
वाडीवऱ्हे, ता.१२ ः वाडिवऱ्हे परिसरात दोन वेगवेगळ्या अपघातात दुचाकीस्वारांसह सात जण जखमी झाले. सांजेगाव रस्त्यावर गुरुवारी (ता.१२) सकाळी साडेनऊच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला. वाडिवऱ्हेकडे येणारी दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने वळणावर दुचाकी स्लीप होऊन रस्त्यावर पडली. चालकाच्या हातपाय व डोक्याला मार लागला. यात समीर दिनकर डगळे (१७), चैतन्य सीताराम पोटकुले (१९), गोटीराम रामदास बोराडे (२०, रा. सांजेगाव, ता. इगतपुरी) हे जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच नरेंद्राचार्य महाराज आश्रमाच्या विनामूल्य रुग्णवाहिकेचे चालक निवृती पाटील गुंड यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दुसरा अपघात महामार्गावर पाडळी देशमुख येथे घडला. विठ्ठल कामत ढाब्याजवळ कार पलटी होऊन पाच जण जखमी झाले. गुरुवारी (ता.) सकाळी साडेअकराच्या सुमारास पाडळीजवळ हा अपघात झाला. मुंबईहून नाशिककडे जाणारी कार ( एमएच४७, ए ६२८७) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकून तिने दोन पलटी घेतल्या. या अपघातात संदीप बंडू कुंभारकर (३२), श्रीनाथ मानसिंग खवळे (३०), आकाश रामदास माळी (२९), अक्षय दशरथ साळुंखे (२८), शुभम वसंत वानखेडे (३०, रा. गंगापूर रोड, नाशिक) यांच्या डोक्यासह हातापायाला मार लागल्याने जखमी झाले.