Leopard
sakal
वडनेर: खाकुर्डी (ता. मालेगाव) येथील डॉ. धनंजय पवार यांच्या गावाजवळील शेतात विहीर खोदकाम सुरु आहे. पाण्याने भरलेल्या विहिरीच्या कपारीत बसलेला बिबट्या गावातील मजुरांना शनिवारी (ता. १३) सकाळी सातच्या सुमारास आढळला. मालेगाव वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी गायत्री सोनवणे कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहा तासाच्या प्रयत्नानंतर विहिरीत पिंजरा टाकून बिबट्याला जेरबंद केले.