leopard
sakal
वणी: वणी ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूस रविवारी (ता. २१) पहाटे तीनच्या सुमारास परिचारिकांना बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. वणी बसस्थानकासमोर ग्रामीण रुग्णालय असून, पहाटे तीनच्या सुमारास तेथे कार्यरत परिचारिका रुग्णालयाच्या मागील बाजूस गेल्या असताना प्रसूतिकक्षाजवळ बिबट्या त्यांच्या निदर्शनास आला.