esakal | #Fightagainstcorona : कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी बंदीबांधवांकडूनही मदतीचे हात पुढे सरसावले!
sakal

बोलून बातमी शोधा

prisoners help for corona.jpg

देशातील कोरोना संकाटाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी विविध संस्था, उद्योग, व्यक्तींना देणगीचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद म्हणून अधीक्षक प्रमोद वाघ आणि अशोक कारकर यांनी कैद्यांना मदतीचे आवाहन केले. त्याला कैद्यांनी प्रतिसाद दिला

#Fightagainstcorona : कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी बंदीबांधवांकडूनही मदतीचे हात पुढे सरसावले!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जगभर आणि देशात फैलावलेल्या कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईसाठी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील बंदीबांधवांनी दोन लाख 78 हजारांचा निधी दिला आहे. कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ आणि वरिष्ठ अधिकारी अशोक कारकर यांनी मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सुपूर्द केला. शिक्षेदरम्यान कैद्यांना जो "सरकारी मेहताना' मिळतो तो निधी कैद्यांनी मदत कार्यासाठी सुपूर्द केला आहे. 

कोरोनाविरुद्धच्या लढाईत कैद्यांकडून मदत 

नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात तीन हजार बंदी आहेत. न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले पक्के आणि न्यायालयात सुनावणी सुरू असलेले कच्च्या कैद्यांचा समावेश आहे. शिक्षा झालेल्या पक्‍क्‍या कैद्यांना कायद्यानुसार काम द्यावे लागते. नाशिक रोड कारागृहातील सुतार, लोहार, विणकाम, मूर्तिकाम, रसायन, बेकरी आदी दहा कारखान्यांतून काम आणि कारागृहाच्या शेतीत काम करणाऱ्या या पक्‍क्‍या कैद्यांना पगार दिला जातो. शिक्षा संपल्यावर आणि गरजेच्या वेळी कारागृह प्रशासनाकडून कैद्यांना पगार दिला जातो.

हेही वाचा > #Lockdown : ...अन् अडकलेल्या 'त्या' गर्भवतीच्या मदतीला 'ते' देवदूतासारखे धावून आले!

जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेश सुपूर्द 
देशातील कोरोना संकाटाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी विविध संस्था, उद्योग, व्यक्तींना देणगीचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद म्हणून अधीक्षक प्रमोद वाघ आणि अशोक कारकर यांनी कैद्यांना मदतीचे आवाहन केले. त्याला कैद्यांनी प्रतिसाद देत त्यांच्या पगारातील 100 रुपयांपासून एक हजारापर्यंतची रक्कम सरकारला देण्याचे ठरविले. त्यानुसार दोन लाख 78 हजारांचा निधी सोमवारी (ता. 30) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सुपूर्द केला. यापूर्वीही नाशिक रोड कारागृहातील कैद्यांनी केरळच्या पूरग्रस्तांना दोन लाखांचा निधी दिला होता. मदतीचा भाग म्हणून कारागृहातील कर्मचारी व अधिकारी त्यांचा एक दिवसाचा पगार शासनाला देणार असल्याचे प्रमोद वाघ यांनी सांगितले. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! 'ते' दोघं मज्जाक - मस्ती करत घराकडे निघाले...मात्र, वाटेत काळाने अडवलं