esakal | प्रभाग सभापति निवडणुक : सानपांची खेळी ढिकले-गितेंच्या पथ्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

balasaheb sanap

प्रभाग सभापति निवडणुक : सानपांची खेळी ढिकले-गितेंच्या पथ्यावर

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : पूर्व विधानसभा मतदारसंघात समाविष्ट पंचवटी व नाशिक रोड प्रभाग समितीत भाजपमध्ये आजी- माजी आमदारांविरोधात झालेल्या राजकीय लढाईत वरकरणी माजी आमदार बाळासाहेब सानप यशस्वी झाल्याचे दिसत असले तरी आमदार ॲड. राहुल ढिकले व स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी दोन्ही सभापतिपदांच्या निवडणुकीला हजेरी लावण्याबरोबरच उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केल्याने संयमी खेळीने बाळासाहेब सानप चितपट झाल्याचे दिसून आले आहे. (Ward-Chairman-Election-balasaheb-sanap-political-news-jpd93)

संयमी खेळीने सानप चितपट

प्रभाग समिती सभापतिपद महत्त्वाचे नसले तरी आगामी निवडणुकीच्या निमित्ताने या पदावर विराजमान होण्यासाठी अनेकांचे प्रयत्न होते. पंचवटी प्रभाग समितीत माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी मुलगा मच्छिंद्र यांच्यासाठी प्रतिष्ठापणाला लावली होती. एकेकाळी भाजपची संपूर्ण यंत्रणा हलविण्याची क्षमता असलेल्या सानप यांनी मुलगा मच्छिंद्रसाठी प्रदेश पातळीवरील नेत्यांशी संपर्क साधल्याने सानप यांच्याकडून पक्षात पुन्हा स्थान बळकट करण्यासाठी सुरू झालेल्या प्रयत्नांमुळे नाराजी व्यक्त केली जात होती. त्याचाच एक भाग म्हणून रुची कुंभारकर व पूनम सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रभाग समिती सभापती या छोट्या पदासाठी सानप यांनी जंगजंग पछाडल्याने आमदार ढिकले व स्थायी समिती सभापती गिते समर्थकांमध्ये अस्वस्थता होती. परंतु, सानप यांचे छोट्या पदासाठी प्रयत्न लक्षात घेता ढिकले व गिते यांनी संयमाची भूमिका घेत पंचवटी प्रभाग समितीत त्यांना चाल देत मच्छिंद्र सानप यांना निवडून आणले. मच्छिंद्र यांच्या निवडीमुळे त्यांचा भविष्यातील मोठ्या पदावरचा दावा संपला, तर नाशिक रोडमध्ये सानप समर्थकांनी दांडी मारल्याने दुसरीकडे पक्षात पुनर्प्रवेश करून पुन्हा गटबाजी सुरू केल्याचे चित्र निर्माण झाल्याने ही बाब ढिकले व गिते यांच्या पथ्यावर पडली आहे.

गणेश गिते व माझ्याकडे पंचवटी प्रभाग समिती सभापतिपदाची जबाबदारी होती. सभापतिपदासाठी तिघे इच्छुक होते. त्यातील मच्छिंद्र सानप यांचे नाव निश्‍चित झाले. त्यासाठी पक्षश्रेष्ठींनी सूचना केली होती, पक्षादेशाचे पालन केले. - ॲड. राहुल ढिकले, आमदार

हेही वाचा: नाशिक रोडला भाजपमध्ये फूट; सानप समर्थक आमदारांची दांडी

हेही वाचा: नाशिकमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची ऑगस्टमध्ये तयारी

loading image