

Dada Bhuse News : पांडाणे येथे सुरू होणाऱ्या टोलनाक्यावर वाहतूक पोलिसांनी वसुली मोहीम सुरू केली होती. परराज्यातील वाहनांची अडवणूक करून त्यांना आर्थिक भुर्दंड बसत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या.
याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलिस अधीक्षकांना विनाकारण प्रवाशांना त्रास न देण्याची तंबी दिली. (warning of dada bhuse Stop collection by police at toll booths nashik news)
सध्या वाहतूक पोलिसांनी टोलनाक्याचा परिसर सोडल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
शिर्डी येथे पदयात्रा करणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सुरत-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग करण्यात आला. प्रवासासाठी सुखकर झाल्याने या मार्गावरून गुजरातमधून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे.
त्यात सप्तशृंगी गड, नाशिक, त्र्यंबकेश्वर, शिर्डी, शिंगणापूर, अशा ठिकाणी गुजरातमधील पर्यटक जातात. पांडाणे येथे राष्ट्रीय महामार्गाचा अधिकृत टोलनाका आहे. तो सध्या सुरू झालेला नाही. काही बाबींची पूर्तता प्रलंबित आहे. टोलनाका परिसरात पोलिसांनी तपासणी नाका सुरू केला आहे.
गुजरातमधून ये- जा करणारी, तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील वाहने अडवून तपासणी करणे, चालकांना ताटकळत ठेवणे, कागदपत्रे असतानाही अकारण वाहने रस्त्यावर उभी करण्यास भाग पाडणे, अशा प्रकारामुळे वाहनचालक त्रस्त झाले होते. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी वाहतूक पोलिसांनी प्रवाशांना त्रास न देण्याबाबत मागणी केली होती.
याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. पालकमंत्री दादा भुसे यांनी या वृत्ताची दखल घेतली. पोलिस अधीक्षकांशी चर्चा करून त्या पोलिसांना सूचना देऊन विनाकारण पर्यटक व भाविकांना त्रास देऊन महाराष्ट्र राज्याची बदनामी करू नका, असे स्पष्ट शब्दांत पालकमंत्री भुसे यांनी खडसावले. यानंतर असे काही घडणार नाही, याची दक्षता घेण्याचीही सूचना त्यांनी केली आहे. यामुळे पांडाणे टोलनाक्यावरील वसुली पोलिस सध्या दिसेनासे झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.