Nashik News: फळवीर वाडीच्या नशिबी अजूनही अवहेलनाच; आठ महिन्यांपूर्वी तलाव फुटल्यापासून परिस्थिती जैसे थे

The seepage lake here burst due to heavy rains. In the second picture, the struggle of women for a bucket of water at the bottomed well is going on
The seepage lake here burst due to heavy rains. In the second picture, the struggle of women for a bucket of water at the bottomed well is going onesakal

Nashik News : गेल्यावर्षी १ सप्टेंबरला रात्री अकराच्या सुमारास झालेल्या ढगफुटीसदृश्‍य अतिवृष्टीमुळे फळवीर वाडी येथील पाझर तलाव अचानक फुटला होता. त्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत शासनाकडून अद्याप काहीही हालचाल झालेली नाहे. तब्बल आठ महिन्यांपासून या भागातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत असून, अजूनही मदतीची प्रतिक्षा आहे. (water crisis in Falveer Wadi Conditions same since lake burst eight months ago Nashik News)

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील फळवीर वाडी येथील पाझर तलाव अचानक फुटल्याने अनेक आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीनी उभ्या पिकांसह पूर्णत: वाहून गेल्या. शिवार रस्ते, विहिरी पूर्णपणे वाहून व बुजून नेस्तनाबूत झाल्या.

अनेक शेतकऱ्यांच्या झापवस्तीत पाणी शिरले. अशा परिस्थितीत जीव वाचविण्यासाठी स्थानिकांचा आरडाओरडा होत असताना, तहसीलदार परमेश्‍वर कासुळे यांनी प्रशासन व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांचे पथक मदतीसाठी पाठवून पुराच्या पाण्यात अडकलेल्या स्थानिकांना सुखरूप सुरक्षित ठिकाणी पोचवले.

यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली होती. तर, ३ सप्टेंबरला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी गंगाथरण डी., तत्कालीन पोलीस आधिक्षक सचिन पाटील, जि. प.च्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, तहसीलदार कासुळे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांसह पाहणी करून, तत्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्यास सांगितले होते.

पाझर तलाव आठ दिवसांत पुन्हा तयार केला जाईल असा शब्दही श्री. महाजन यांनी दिला होता. संबंधीत अधिकाऱ्यांना सूचनाही करण्यात आल्या. असे असताना आज आठ महिन्यांनंतरही हा पाझर तलाव अद्यापही नादुरुस्त अवस्थेत आहे.

प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. ना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली, ना येथील रस्ते दुरुस्त झाले. अडसरे येथील भंडारदरा वाडीकडे जाणारा अत्यंत महत्वपूर्ण असा पन्हाळ रस्ताही वाहून गेलेल्या अवस्थेतच आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

The seepage lake here burst due to heavy rains. In the second picture, the struggle of women for a bucket of water at the bottomed well is going on
Nashik Crime : गुड्डू मुस्लिमचे नाशिक कनेक्शन अफवाच! दिल्ली पोलिसांकडून शस्त्रास्त्र प्रकरणी वेटरची चौकशी

पाण्यासाठी आजही पायपीट

स्थानिक आदिवासी महिलांना आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी मिळेल तिथे, भर उन्हात, रानोमाळ पायपीट करावी लागतेय. जलजीवन मिशन अंतर्गत राष्ट्रीय पेयजल योजना याठिकाणी मंजूर आहेत.

परंतु, योजनांचे पाणी फळवीर वाडीत पोचलेले नाही. गुरा-वासरांना पिण्याच्या पाण्यासाठी कडवा धरणाकडे न्यावे लागत आहे. आतातरी प्रशासनाने आमची दखल घ्यावी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडवावा.

फळवीर वाडी येथील पाझर तलाव तत्काळ दुरुस्त करावा. वाहून गेलेल्या जमिनी, रस्ते, नेस्तनाबूत झालेल्या जवळपास ७४ शेतकऱ्यांच्या विहिरींची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी येथील स्थानिक शेतकरी करत आहेत.

"मागील वर्षी जोरदार अतिवृष्टीमुळे पाझर तलाव फुटला. सर्वत्र पाण्याचे तांडव झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी उभ्या पिकांसह वाहून गेल्या. या नुकसानीचे पंचनामे झाले; परंतु अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही. वाहून गेलेला अडसरे बुद्रुक ते भंडारदरा वाडी पन्हाळ रस्ता अद्यापही दुरुस्ती झालेला नाही. हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा."

-किरण साबळे, शेतकरी, अडसरे बुद्रुक

"पाझर तलाव फुटल्यापासून आजपर्यंत कोणीही याकडे लक्ष दिले नाही अथवा दुरुस्तीदेखील केली नाही. साठवण तलाव, बंधाऱ्याच्या पाण्यावर आमची गुरे-वासरे, पाळीव जनावरे अवलंबून होती. आज आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. रोजच पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो आहे."-सुदाम कातोरे, शेतकरी, फळवीर वाडी

"सरकारला एकच विनंती आहे, की लवकरात लवकर आमचा बंधारा दुरुस्ती करून आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देऊन खरीप हंगामासाठी वाहून गेलेल्या व फुटलेल्या जमीनीची मशागत करण्यासाठी त्वरित मदत करावी." -लक्ष्मण भांगरे, नुकसानग्रस्त शेतकरी

"प्यायला, धुण्या-भांड्याला, अंघोळीला आणि गुरा-वासरांसाठी डोक्यावर हंडा घेऊन मिळेल तिथे जाऊन ओढून पाणी आणावे लागते. आमची पाण्यासाठी खूप मोठी अडचण झाली आहे. लवकरात लवकर काहीतरी करा; पण आम्हाला पाणी द्या."

-शंकूतला कातोरे, फळवीर वाडी

The seepage lake here burst due to heavy rains. In the second picture, the struggle of women for a bucket of water at the bottomed well is going on
Nashik Fraud Crime : मशिन देण्याच्या बहाण्याने 60 लाखांची फसवणूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com