शहरावरचे पाणीकपातीचे संकट टळले; गंगापूर धरणात 65 टक्के पाणीसाठा | Latest rain marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gangapur dam Latest marathi news

शहरावरचे पाणीकपातीचे संकट टळले; गंगापूर धरणात 65 टक्के पाणीसाठा

नाशिक : जून महिन्यात पावसाने (rain) दिलेली ओढ व गंगापूर धरणातील आरक्षित पाणीसाठा (Water storage) संपुष्टात येत असल्याने १५ जुलैला बैठक घेऊन पाणीकपातीचा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. जुलै महिन्यात गंगापूर धरण ६५ टक्के भरल्याने शहरात आता पाणीकपात होणार नाही. (water crisis over city gone 65 percent water storage in Gangapur dam nashik Latest rain marathi News)

गंगापूर, मुकणे व दारणा धरणातून शहराला पाणीपुरवठा होतो. मागील वर्षी गंगापूर धरणातून चार हजार, मुकणेतून १५००, तर दारणा धरणातून १०० असे एकूण ५, ६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले होते. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाणी साठ्याचा आढावा घेण्यात आला.

त्यानुसार गंगापूर धरणात २३, तर मुकणेत ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे १५ जुलैला पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक घेण्याचा निर्णय आयुक्त रमेश पवार यांनी घेतला होता. परंतु, १० ते १२ जुलै दरम्यान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणांची पातळी उंचावली.

हेही वाचा: गोविंदनगर रस्ता खचला; महापालिकेची ठक्कर डेव्हलपर्सला नोटीस

जुलै महिन्यात गंगापूर धरण ६५ टक्के भरले जाते. त्याव्यतिरिक्त जमा होणारे पाणी नियमानुसार नदीपात्रात सोडावे लागते, तर सप्टेंबर महिन्यात ९५ टक्के धरण भरल्यानंतर उर्वरित पाणी सोडावे लागते. गंगापूर ६५ टक्के भरले, तर दारणा धरणाचा पाणीसाठा ७० टक्क्यापर्यंत पोचला आहे. मुकणेत ५१ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे नाशिककरांवरील पाणीकपात टळली आहे.

हेही वाचा: Latest Marathi News : सांडपाण्यातच संसार थाटण्याची वेळ; गटारीचे पाणी घरात

Web Title: Water Crisis Over City Gone 65 Percent Water Storage In Gangapur Dam Nashik Latest Rain Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..