सिन्नर- सिन्नर नगर परिषदेच्या कडवा पाणी योजनेच्या शिवडे येथील जलवाहिनीला असलेली पाणी गळती दुरुस्तीला सोमवारी अखेर मुहूर्त मिळाला. दंगा नियंत्रक पथक, सिन्नर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दरम्यान ग्रामस्थांनी सुरवातीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मोठा बंदोबस्त असल्याने त्यांचे काहीही चालले नाही.