Nashik News : सिडकोवासीयांच्या जिवाशी खेळ; 36 वर्षापूर्वी बांधलेला जलकुंभ झाला जीर्ण!

Dilapidated water tank built 36 years ago at Pawannagar
Dilapidated water tank built 36 years ago at Pawannagaresakal
Updated on

Nashik News : सिडकोवासीयांसाठी ३६ वर्षापूर्वी बांधलेला जलकुंभ सद्यःस्थितीत अखेरच्या घटका मोजत असून, तो कधीही जमीनदोस्त होऊ शकते. अशी परिस्थिती असूनदेखील या गंभीर बाबीकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.

सिडको परिसर हा कामगार लोकांची वस्ती असलेला परिसर म्हणून ओळखला जातो. वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुमारे ३६ वर्षांपूर्वी पवननगर परिसरामध्ये जलकुंभ बांधला होता.

सद्यःस्थितीत हा जलकुंभ जीर्ण झाला असून, अवशेष खाली पडू लागले आहेत. (water reservoir built 36 years ago become dilapidated and broken at cidco Nashik News)

महापालिका प्रशासनाने गेल्या चार वर्षांपूर्वी या जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडिटदेखील केले होते. मात्र चार वर्षे उलटूनही याबाबत ठोस निर्णय न घेण्यात आल्याने जर एखादा गंभीर प्रसंग घडला तर त्याच जबाबदार कोणास धरायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जीर्ण झालेला जलकुंभ कधीही खाली कोसळू शकतो. याचे गांभीर्य प्रशासनाने घेणे अत्यावश्यक आहे. जलकुंभ सभोवताली सिडकोचे सुमारे ५० घरे आहेत. एका बाजूला पवननगरचे उघडे मैदान आहे.

या पाण्याच्या टाकीची क्षमता तीस दशलक्ष असून, तिच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या पाण्याच्या टाकीची क्षमता वीस दशलक्ष आहे. दुर्दैवाने जलकुंभ वीज दशलक्ष जलकुंभावर कोसळला तर तीदेखील कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dilapidated water tank built 36 years ago at Pawannagar
Nashik News : दोन दुर्घटनांत दोघा महिलांचा मृत्यू

अपघात झाल्यास जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. प्रशासन एकप्रकारे नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा थेट आरोप सिडकोवासीयांनी केला आहे. खरंच एखादा अपघात घडल्यानंतरच प्रशासनास जाग येते का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

"सिडकोची निर्मिती झाली त्या वेळेस हे जलकुंभ बांधण्यात आले. या जलकुंभास ३६ वर्षे झाली असल्याने त्याची क्षमता संपलेली आहे. स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट देऊन सुद्धा अजूनही या बाबीवर गांभीर्याने बघितले गेले नाही. अपघात होऊन जर जीवितहानी झाली तर यासाठी सर्वस्व जबाबदार पाणीपुरवठा विभाग व मनपा प्रशासन असेल. येथे आधी नवीन जलकुंभ बांधावा, मग हा जीर्ण जलकुंभ जमीनदोस्त करावा." - सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, ठाकरे शिवसेना

"पवननगर येथे बांधलेला जलकुंभ बांधल्यापासूनच जीर्ण होती. ती कधीही पूर्ण क्षमेतेने भरण्यात येत नसल्याने पाण्याची समस्या नेहमीच निर्माण होत असतं. पूर्ण क्षमेतेने भरल्यास ती कोसळण्याची भीती अधिक होती, यामुळेच दुसरा वीस दशलक्ष जलकुंभ बांधण्यात आला."

- अपूर्व हिरे, माजी आमदार

"पवननगर जलकुंभाचे ३६ वर्षानंतर अवशेष पडायला लागलेले आहेत. सदर जलकुंभाचे स्ट्रक्चर ऑडिट करूनदेखील मनपा प्रशासन सर्रास दुर्लक्ष करत आहे. कदाचित काही दिवसानंतर जलकुंभ कोसळल्यानंतर मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नवीन जलकुंभाचा प्रस्ताव ठेवावा." - रत्नमाला राणे, माजी नगरसेविका

Dilapidated water tank built 36 years ago at Pawannagar
Nashik ACB : लाचलुचपत प्रतिबंधकच्या अप्पर अधिक्षकपदी रेड्डी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com