नाशिक : माणसांप्रमाणेच प्राण्यांचीही पाण्यासाठी वणवण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water scarcity in Thanpada and Harsul

नाशिक : माणसांप्रमाणेच प्राण्यांचीही पाण्यासाठी वणवण

हरसूल (जि. नाशिक) : हरसूल व ठाणापाडा परिसरातील अनेक विहिरींनी तळ गाठल्याने पाणीटंचाईची (Water Scarcity) दाहकता तीव्र बनली आहे. माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्यांनाही घोटभर पाण्यासाठी माळोरान भटकंती करावी लागत आहे. महिलांना पाण्याच्या शोधार्थ रात्रीचा दिवस करावा लागत आहे. (water scarcity in Thanpada and Harsul)

एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच परिसरातील तोरंगण या प्रमुख गावांसोबतच अनेक वाड्या-वस्त्यांवरील विहिरी, कूपनलिका, तलाव, वनबंधारे, खासगी बोअर कोरडेठाक पडले आहेत. गावाजवळील पाण्याचे सर्वच स्रोत आटल्याने हंडाभर पाण्यासाठी कोसो दूरून महिलांना डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. बैलगाडी, सायकल, दुचाकी, चारचाकी वाहनांतून पाणी आणून तहान भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचा: नाशिक : नुकतीच दहावीची परीक्षा दिलेला साई धरणात बुडाला

पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात दर वर्षी पावसाळ्यात दोन हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस होतो. मात्र, ग्रामीण भागाला एप्रिल-मेमध्येच पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तालुक्यात जलयुक्त शिवार योजना, वसुंधरा पाणलोट विकास कार्यक्रम, ‘पाणी आडवा-पाणी जिरवा’, कृषी विभागाचे पाणी अडविण्यासाठी मजबुतीकरण, वनतळे, काँक्रिट बंधाऱ्याबरोबरच शासनाच्या विविध विभागांमार्फत पाण्याच्या उपलब्धतेसाठी अनेक योजना राबविल्या जातात. लाखो रुपयांच्या योजना राबवूनही तोरंगण गाव तहानेने व्याकूळ झाले आहे.

हेही वाचा: नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रूग्णालयात मद्य पार्टी

विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर तालुक्यात अनेक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या. मात्र, नियोजनाअभावी सर्वसामान्य जनतेसोबतच मुक्या प्राण्यांनाही पाण्यासाठी त्रास सोसावा लागत आहे. सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने घोटभर पाण्यासाठी वन्यप्राणी-पक्षी बाजारपेठ, गाव, वाड्या-वस्त्यांवर येत आहेत. त्यामुळे माणसांप्रमाणेच पशू-पक्ष्यांच्या जीविताचाही प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील जंगलांमध्ये वन विभाग व अन्य यंत्रणेकडून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची उपलब्धता करून देण्याची मागणी होत आहे.

दृष्टिक्षेपात...

-तोरंगणला पाण्यासाठी अनेक उपाययोजना; मात्र नशिबात पाणीटंचाईच

-निरगुडेहून सुमारे आठ ते दहा किलोमीटर पाइपलान करून पाणी आणले. मात्र, अल्पावधीतच योजनेची नासधूस

-दोन विहिरी खोदून, पाइपलाइनद्वारे पाण्याची सोय करण्याचा प्रयत्न, पण विहिरींना अपूर्ण पाणी

-सोशल नेट्वर्किंग फोरमकडून जल-शुद्धीकरण प्रकल्प वापराविना धूळखात

-सामाजिक संस्थांकडून तोरंगणला दरान टाक्यांची निर्मिती, पण पाण्याविना कोरड्याठाक

-जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी सुखदेव बनकर गावात मुक्कामी राहून पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन कागदावरच

-ग्रामपंचायतने तीन कूपनलिका केल्या. मात्र, त्याही कोरड्याठाक.

-तीन कूपनलिकांपैकी दोन बंद अवस्थेत.

-जलयुक्त शिवार योजनेतून करोडोंचा खर्च. मात्र, भीषण पाणीटंचाई

"प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत तोरंगण गावाचा समावेश असून, या योजनेत इतर आठ गावे आहेत. त्यामुळे तोरंगणला पाणी मिळेल की? पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाला तळ गाठावा लागेल, हा प्रश्न आहे. तोरंगण व वाहंदरी या गावांना स्वतंत्र जलजीवन मिशन योजन द्यावी व पाणीटंचाई थांबवावी."

-राहुल बोरसे, ग्रामस्थ, तोरंगण (ह.)

Web Title: Water Scarcity In Harsul Thanpada Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top