विभागात टंचाईच्या तीव्र झळा; राज्यात गेल्या वर्षीपेक्षा 147 टँकर अधिक

Water tanker
Water tankeresakal

नाशिक : मॉन्सूनच्या (Monsoon) हुलकावणीमुळे ऐन पावसाळ्यात (Rainy Season) कोकणासह नाशिक विभागात टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. राज्यातील ५९१ गावे आणि १ हजार ३१२ वाड्यांसाठी सध्या ५०१ टँकरद्वारे (Water Tanker) पाणीपुरवठा (Water Supply) करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या जूनच्या मध्याच्या तुलनेत आता अधिकचे १४७ टँकर पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी धावताहेत. (water scarcity in Nashik region Nashik News)

राज्यातील ४९३ गावे आणि ६८२ वाड्यांसाठी गेल्यावर्षी जूनच्या मध्याला ३५४ टँकर सुरू होते. दरम्यान, सिंधूदुर्ग जिल्ह्याचा अपवाद वगळता कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यातील २११ गावे आणि ६४० वाड्यांसाठी ११५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागील आठवड्याप्रमाणे धुळे जिल्ह्यातील २ गावे आणि २ वाड्यांसाठी २, नंदुरबार जिल्ह्यातील २ पाड्यांसाठी १, जळगावमधील ९ गावांसाठी ८, नगर जिल्ह्यातील ९ गावांसाठी ९ टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा कायम आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील गावांमध्ये एकाची आणि वाड्यांमध्ये पाचची भर पडून सध्या ९१ गावे आणि १५९ वाड्यांसाठी ८२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत एका टँकरची भर पडली आहे. कोकण आणि नाशिक विभागातील गावे-वाड्यांसाठी २३४ टँकर सुरू आहेत.

पालकमंत्र्यांच्या सूचनेचे पुढे काय?

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यापूर्वीच्या दुष्काळामध्ये नाशिक जिल्ह्यात तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी गाव आणि वाड्यांसाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल, अशा उपाययोजना राबविण्याची सूचना केली होती. त्यावेळी प्रत्यक्ष दुष्काळात काम करणाऱ्या यंत्रणेतील अधिकारी आता कार्यरत नसल्याने श्री. भुजबळ यांच्या यापूर्वीच्या सूचनेचे काय झाले? हा खरा प्रश्‍न आहे. मॉन्सूनच्या सर्वदूर हजेरीसाठी लागणाऱ्या कालावधीचा विचार करता, कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी काय करता येईल, याचा विचार करून यंत्रणेकडून अंमलबजावणी होऊ शकते, अशी स्थिती सध्याच्या हवामानावरून दिसते.

Water tanker
Nashik : विधी, शिक्षणशास्‍त्र सीईटी नोंदणीची 22 पर्यंत मुदत

विभागनिहाय टँकरची स्थिती

विभागाचे नाव गावे वाड्या टँकर

कोकण २११ ६४० ११५

नाशिक १४० २८८ ११९

पुणे ७८ ३४६ ७९

औरंगाबाद ७२ ३८ ९४

अमरावती ८५ ० ८७

नागपूर ५ ० ७

(सिंधूदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, अकोला, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात एकही टँकर सुरू नाही)

Water tanker
सार्वजनिक बांधकाम विभाग करणार पर्यायी रस्त्यांची व्यवस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com