Water Shortage : येवल्यासाठी सोडले पालखेडचे आवर्तन; टंचाईत मिळणार आधार

Residual water in municipal storage ponds
Residual water in municipal storage pondsesakal

Water Shortage : शहरावर पाणीटंचाईचे ढग दाटत असल्याने सद्या सहा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. टंचाईच्या प्राश्वभूमीवर पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन मंगळवारी सोडण्यात आले आहे.

या बिगर सिंचनाच्या आवर्तनातून शहराचा साठवण तलाव भरून देणार असल्याने शहरवासियांना टंचाईच्या काळात दिलासा मिळणार आहे. (Water Shortage Reversal of Palkhed left for coming available in scarcity nashik news)

साठवण तलाव झपाट्याने आटत असल्याने व पालखेडचे आवर्तन बेभरवशाचे असल्याने पालिकेने महिन्यापासून सहा दिवसांआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या टप्पा क्रमांक-२ साठवण तलावात केवळ आठ ते दहा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

५० दशलक्ष घनफूट इतकी साठवण क्षमता असलेल्या पालिकेच्या साठवण तलावात सध्या केवळ ०.६० मीटर इतका पाणीसाठा शिल्लक राहिल्याने नगरपालिकेने शहरवासीयांना सहा दिवसाआड एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला होता. केवळ दहा दिवस पुरेल इतकेच पाणी साठवण तलावात शिल्लक आहे.

या साठवण तलावात पालखेडच्या आवर्तनातून पाणी मिळते. साठवण तलावातील अत्यंत तुटपुंजा राहिलेला पाणीसाठा अन् त्यातून शहराला पाच दिवसात होणारा पाणीपुरवठा यामुळे येवला शहरवासियांचे पालखेडच्या बिगर सिंचन आवर्तनाकडे लक्ष लागले होते.

मंगळवारी सायंकाळी पालखेड धरणातून हे बिगर सिंचनाचे आवर्तन सुटले असून पालखेड डाव्या कालव्याचे पाणी उद्या गुरुवारी (ता.१) रात्रीपर्यंत नगरपालिकेच्या साठवण तलावात पोहोचण्याची शक्यता आहे.

मनमाड शहर व रेल्वेसह येवला शहर व ३८ गाव योजनेचे तलाव या आवर्तनातून भरून देणार असल्याची माहिती येथील पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता श्री. पाटील यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Residual water in municipal storage ponds
Nashik News : चंडीकापूरच्या चंडिकांचा दारुबंदीसाठी एल्गार!

साठा एकदमच खालावला

दोन महिन्यांपूर्वी सुटलेल्या पालखेडच्या आवर्तनातून नगरपालिकेचा साठवण तलाव भरून मिळाला होता. पालखेड आवर्तनातून मिळालेले हे पाणी नगरपालिकेने नियोजन करून शहरवासियांना किमान अडीच महिने पुरविण्याची गरज होती.

मात्र साठवण तलावातून परिसरातील शेकडो विहिरींमध्ये होणारा पाझर, उन्हाळ्यातील बाष्पीभवन अन् कोलमडलेले पालिकेचे नियोजन यामुळे तलावातील पाणीसाठा एकदमच खालावला.

दहा दिवस आधीच आवर्तन

साठवण तलावातील पाणी लवकर म्हणजे दोनच महिन्यातच संपल्याने पालखेड प्रशासनाला देखील आपल्या निर्धारित तारखेच्या ११ दिवस अगोदरच आवर्तन सोडावे लागले आहे. पालखेडचे आवर्तन १० जूनपासून सोडण्याचे पालखेड प्रशासनाने निश्चित केले होते.

मात्र शहरातील पाणीटंचाई अधिक गडद होऊ नये या दृष्टिकोनातून पालखेडचे आवर्तन लवकर सुटले आहे. आता पालखेडच्या सुटलेल्या आवर्तनातून मिळणारे पाणी येवला नगरपालिकेने योग्य नियोजन करून शहरवासीयांना पुरविण्याची नितांत गरज आहे.

Residual water in municipal storage ponds
Brave Mother: बाळ घरात अडकलं अन् 'हिरकणी'नं बाळाला वाचवण्यासाठी जे केलं ते वाचून उडेल थरकाप!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com