esakal | धरणांचा पाणीसाठा ५० टक्यांच्या खाली; भाम धरणात केवळ मृतसाठा शिल्लक

बोलून बातमी शोधा

water storage
धरणांचा पाणीसाठा ५० टक्यांच्या खाली; भाम धरणात केवळ मृतसाठा शिल्लक
sakal_logo
By
गोपाल शिंदे

घोटी (जि. नाशिक) : मान्सूनपर्वामध्ये मागीलवर्षी दमदार पावसाच्या हजेरीने धरणे तुडुंब भरली होती, मात्र तितक्याच झपाट्याने धरणांतील विसर्गामुळे एप्रिल महिन्यातच पाणीपातळी देखील कमी होत आहे.

बाजारभाव तेजीत

मुंबईसह मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या इगतपुरी धरणांतील नियंत्रित जलसाठा, पन्नास टक्क्यांच्या खाली आला अल्याने मुंबईकरांनो पाणी जपून वापरा नाही तर एकीकडे कोरोना दुसरीकडे पाणी कपातीची वेळ आपल्यावर येवू शकते. जलसाठा जस-जसा खाली सरकत आहे, तस-तसे परिसरातील बागायती सिंचन क्षेत्र कमी होवू लागल्याने भाजीपाला पिकांची मागणी वाढून बाजारभाव तेजीत येत आहे. सात ते अकरा उपजीविका साधने सुरु झाल्याने भाजीपाल्याची अधिक मागणी वाढत असल्याचे चित्र बाजारपेठांतून दिसत आहे.

हेही वाचा: महामारी आजारांचा चारशे वर्षांचा इतिहास! सोशल मीडियावर संदर्भासह चित्र व वृत्त

रब्बी पिके धोक्यात येण्याची चिन्ह

इगतपुरी तालुक्यात सात मोठी धरणे असून, त्यात वैतरणा धरण मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत आहे. तर मुकणे, दारणा, भाम, वाकी खापरी, भावली, कडवा ही महत्त्वाची धरणे नांदूर ध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत असली तरी या धरणांचे बहुतांश पाणी मराठवाड्यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे आरक्षणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात या धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला. भाम धरणात केवळ मृतसाठा शिल्लक आहे. जेमतेम धरणांतील जलसाठा हा पन्नास टक्यांच्या खाली आला आहे. परिसरातील भूजलपातळी झपाट्याने घटत आहे. धरणांतील पाण्याने अधिक खोली गाठल्याने रब्बी पिके धोक्यात येण्याची चिन्ह आहेत.

हेही वाचा: डॉक्टर म्हणताहेत..!"नाशिक-नगरची झंझट नको, आम्हाला ऑक्सिजन द्या"

शिल्लक पाणीसाठा

वैतरणा- ४४.२०, दारणा ५३.९४, भावली- ४६.३१, वाकी खापरी- २६.७८, त्रिंगलवाडी, भाम- मृतसाठा, कडवा-२१.७४, मुकणे- ३८.५७, वालदेवी-७७.४३ टक्के.