Water Supply Management : पंचवटीत सोमवारी पाणीपुरवठा बंद! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water supply stop

Water Supply Management : पंचवटीत सोमवारी पाणीपुरवठा बंद!

नाशिक : पंचवटी विभागातील आरपी विद्यालय जलकुंभ, हनुमानवाडी जलकुंभ व मोरे मळा जलकुंभाला जोडलेल्या उर्ध्ववाहिनीला क्रॉस कनेक्शन केले जाणार असल्याने सोमवारी (ता. २३) काम हाती घेण्यात येणार आहे.

यामुळे पंचवटी विभागातील प्रभाग ५, ४ व ६ मधील परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Water Supply Management Water supply stopped in Panchavati on Monday nashik news)

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Wrestler Protest : कुस्तीपटूंच आंदोलन म्हणजे दुसरं 'शाहीन बाग', बृजभूषण यांचा पद सोडण्यास नकार

जुने पंचवटी गावठाण परिसर, सेवाकूंज, गजानन चौक, गुरुद्वारा रोड, ढिकलेनगर, सरदार चौक, नाग चौक, सिता गुंफा रोड, काळाराम मंदिर परिसर ते शनी चौक, सुकेनकर लेन, पंचवटी राजवाडा, आरपी टाकी परिसर, वाल्मीकनगर, संजयनगर, वाघाडी लगतचा परिसर,

गजानन कॉलनी, वाघ मळा, जगझाप मार्ग व मखमलाबाद रोड लगतचा परिसर, मधुबन कॉलनी, जाधव कॉलनी, नवनिर्माण चौक, उदय कॉलनी, कृष्णनगर, ड्रीम कॅसल परिसर, जाणता राजा कॉलनी काही परिसर, क्रांतीनगर, शिंदे मळा, वृंदावननगर, प्रोफेसर कॉलनी, नागरे मळा, मोरे मळा, हनुमानवाडी, चौधरी मळा, तुळजा भवानीनगर

या परिसरातील सोमवारी (ता. २३) सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही व मंगळवारी (ता. २४) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, याबाबत परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

हेही वाचा: RTE : २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया होणार सुरू