नाशिक : प्रेमसंबंधातून युवकावर शस्राने वार; भावासह तिघांवर गुन्हा

crime
crimeesakal

लासलगाव (जि. नाशिक) : लासलगावजवळील पिंपळगाव नजीक येथे एकतर्फी प्रेमसंबंधातून युवकावर धारदार शस्त्राने वार केल्याने गंभीर जखमी झाला. प्रवीण रावळा जाधव असे त्याचे नाव असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लासलगाव पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार युवकावरही विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

लासलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळगाव नजीक येथील नंदावननगर येथे युवक प्रवीणने सोमवारी (ता.२१) रात्रीच्या सुमारास २१ वर्षीय तरुणीच्या घरी जाऊन गोंधळ घातला. तुझ्या आईने माझ्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. तुझ्या नातेवाईकांच्या विरोधात जातीवाचक गुन्हा दाखल करेल असे म्हणत तरुणीचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत आई आणि भावास शिविगाळ दमदाटी केल्याने तरुणीच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

crime
नाशिक : बिअरबार व देशी बार चालकांचा, अवैध मद्यविक्रीला विरोध

त्यानंतर तरुणीचा भाऊ आणि दोघे साथीदारांना प्रवीणच्या घरी जात त्याच्यावर धारदार शस्त्राने हात, पोटावर वार केल्याची घटना सोमवारी रात्रीच्या दरम्यान घडली. गंभीर जखमी प्रवीणला लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात वेळेत दाखल केल्याने युवकाचे प्राण वाचले आहे. सीमा रावळा जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हल्ला करणारे प्रथमेश कैलास सरोदे, शुभम कैलास सरोदे आणि दीपक अजय नवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime
नाशिक : ठेंगोडा येथे धाडसी घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास झाल्याने खळबळ

प्रवीणचे 21 वर्षीय तरुणीसोबत प्रेम संबंधाची माहिती पडल्याने जीवे ठार मारण्याची धमकी देत धारदार शस्त्राने हाता पोटावर वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी फिर्याद दिल्याने या तिघांवर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आर.के.आहिरे, वाडीलाल जाधव करत आहे.

crime
नाशिक : वडील रागावल्याचा आला राग; मुलीने केली आत्महत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com